39.4 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home महाराष्ट्र मतदानासाठी राज्यात सार्वजनिक सुटी जाहीर

मतदानासाठी राज्यात सार्वजनिक सुटी जाहीर

0
27

मुंबई berartimes.com दि. 11 – राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणूक कार्यक्रमांतर्गत या निवडणुकांच्या मतदानासाठी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे.जळगाव, नगर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली या पंधरा जिल्हा परिषदांकरिता त्यांच्या कार्यक्षेत्रात व त्याअंतर्गत 165 पंचायत समित्यांच्या क्षेत्रामध्ये सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी, म्हणजे येत्या गुरुवारी (ता. 16) सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली

आहे. मात्र, यातील गडचिरोली जिल्हा परिषदेंतर्गत कोरची, कुरखेडा, देसाईगंज (वडसा), आरमोरी, गडचिरोली, धानोरा, चामोर्शी, मुलचेरा या आठ पंचायत समितीपुरती ही सुटी मर्यादित राहील. त्याचप्रमाणे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अमरावती व गडचिरोली या अकरा जिल्हा परिषदांसाठी त्यांच्या कार्यक्षेत्रात व त्याअंतर्गत 118 पंचायत समित्यांच्या क्षेत्रामध्ये तसेच बृहन्मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, अकोला, अमरावती व नागपूर या दहा महानगरपालिकेच्या क्षेत्रात सार्वत्रिक निवडणुकांच्या मतदानाच्या दिवशी मंगळवारी (ता.21) सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, यातील गडचिरोली जिल्हा परिषदेंतर्गत अहेरी, एटापल्ली, भामरागड व सिरोंचा या चार पंचायत समिती क्षेत्रापुरती सदरची सुटी मर्यादित राहील, असे सामान्य प्रशासन विभागाच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.