क्षत्रिय पोवार समाजाच्या युवक युवती परिचय मेळाव्याला उत्स्फुर्त प्रतिसाद

0
9

पुणे,दि.४- क्षत्रिय पोवार समाज संघ, पुणेच्यावतीने स्थानिक रत्नलोक होटल (आकुर्डी)येथे समाजातील विवाहयोग्य युवक युवतींचा परिचय मेळावा उत्साहात पार पडला.या परिचय मेळाव्यात युवक युवतीसंह त्यांचे आईवडिल व नातेवाईकांनी सहभागी होऊन विवाहस्तुकांची भेट घडवून आणण्यात आली.गेल्यावर्षीसुध्दा समाजाच्यावतीने अशाच कार्यक्रमाचे आयोजन उत्साहात करण्यात आले होते.यावर्षीच्या कार्यक्रमात १०० पेक्षा अधिक इच्छुकांनी माहितींचा आदानप्रदान करीत सहभागी होण्यासाठी नोंद केली होती.त्यापैकी ७०(३२ युवक व ३८ युवतींनी)जणांनी सहकुटुंब सहभागी झाले.गेल्यावर्षी ६५ जणांनी माहिती घेतली होती.त्यापैकी ३० युवक युवती परिचय मेळाव्यात सहभागी झाले होते.
त्यादृष्टीने यावर्षी समितीच्यावतीने करण्यात आलेल्या प्रचार व प्रसारामुळे अधिकाधिक समाजबांधव पुणे शहरातीलच नव्हे तर पुणे,गोंदिया,बालाघाट,qछदवाडा,सिवनी,नागपूर,रायपूर,मुंबई,तुमसर ,वारासिवनी आदी जिल्हा परिसरातील समाजबांधवांनी सहभागी होत पोवार समाज संघटनेला बळकटी प्रदान करण्यातही एकप्रकार सहकार्य केले.परिचय मेळाव्यानंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी आलेल्या युवक युवतींनी आपला परिचय उत्साहात दिला.त्या सर्वांना डायरेक्ट्री भेटस्वरुपात देण्यात आली,ज्यामध्ये आधीच युवक युवतींची माहिती संकलित करुन ठेवण्यात आली होती.