कर्जमाफीसाठी नांदेडात अर्थमंत्र्यांची गाडी अडविली

0
9

नांदेड दि.29–:शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी नांदेड शहरात रविवारी दुपारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वाहनांचा ताफा अडविला़ पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यावर हा ताफा पुढे रवाना झाला.एका कार्यक्रमासाठी मुनगंटीवार हे नांदेडात आले होते़ कार्यक्रमस्थळी जाताना बजाज गॅलेक्सी परिसरात स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माधव पाटील देवसरकर यांच्या नेतृत्वाखाली पंधरा ते वीस कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा अडविला़ जवळपास दहा मिनिटे अर्थमंत्र्यांच्या वाहनाचा ताफा या कार्यकर्त्यांनी रोखला होता. ताफ्यातील पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले़ त्यानंतर, मुनगंटीवार हे कार्यक्रमस्थळी पोहोचले़ .