मोहफूल परवान्यामुळे विकासाला चालना-आ.संजय पुराम

0
44

देवरी, दि.29–: वनोपज असलेल्या मोहफुलावर प्रक्रिया करुन गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा-देवरी क्षेत्रात उद्योग सुरु करावे आणि त्यासाठी शासन स्तरावर मंजुरी देण्यात यावी अशी मागणी आमगावचे आमदार संजय पुराम यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली होती. त्यासाठी दीड वर्षापासून त्यांचा पाठपुरावा सुरू होता. अखेर मोहफुल वाहतूक परवानामुक्त करून वनमंत्र्यांनी मोहफुलातून उद्योग उभारणीच्या कामात एक पाऊल उचलले असून यामुळे जिल्हावासीयांना मोठा दिलासा मिळणार, अशी भावना आ.संजय पुराम यांनी व्यक्त केली.
विविध गुणांनी परिपूर्ण असलेल्या मोहफू उत्पादनातून अनेकांना रोजगाराची संधी प्राप्त होऊ शकते. परंतु मोहफुलाच्या वाहतुकीवर प्रतिबंध असल्याने व त्याचा परवाना घेणे आवश्यक असल्याने गरीब आदिवासी लोकांनी संकलित केलेल्या मोहफुलाला योग्य किंमत मिळत नाही. नाईलाजाने आदिवासींना स्थानिक व्यापाऱ्यांना कवडीमोल भावाने मोहफुल विक्री करुन आपल्या गरजा भागवाव्या लागतात. परंतु व्यापारी वर्ग त्या मोहफुलांना संग्रही करुन नंतर ४ ते ५ पट अधिक दराने विक्री करतात.