जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांना अंमलबजावणी अधिकारी म्हणून अधिकार प्रदान

0
5

नांदेड,दि.12-जिल्ह्यात शुक्रवार 14 एप्रिल ते रविवार 30 एप्रिल 2017या कालावधीमध्येभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीमोठ्या प्रमाणात साजराकेलीजाणार आहे. त्याकरीतामिरवणुका, विविध कार्यक्रम यांच्या अनुषंगाने या कालावधीतशांतता व सुव्यवस्था रहावी यासाठीपोलीस अधीक्षक यांनीमहाराष्ट्रपोलीस अधिनियम1951चे कलम 36 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारान्वये सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीसस्थानकांचेप्रभारी अधिकारी,बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी यांनाशुक्रवार 14 एप्रिल ते रविवार30 एप्रिल 2017च्या मध्यरात्री पर्यंतअंमलबजावणी अधिकारी म्हणूनअधिकार प्रदान केला आहे.
या अधिकारान्वये संबंधीत अधिकाऱ्यांना पुढील प्रमाणे अधिकारी राहणार आहेत.रस्त्यावरीलकिंवारस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा रितीने चालावे, त्यांनी वर्तणूक किंवा वागणूक कशी ठेवावी याविषयी निर्देश देणे. अशा कोणत्याही मिरवणुका या कोणत्या मार्गाने, कोणत्या वेळात काढाव्यातकिंवा काढू नयेत असे मार्ग व अशा वेळा विहित करणे. सर्व मिरवणुकीच्या व जमावांच्या प्रसंगी व उपासनेच्या वेळी व कोणत्याही रस्त्यावर किंवा सार्वजनिक जागी किंवा सार्वजनिक स्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळा होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा न होऊ देणे यासाठी योग्य ते आदेश देणे. सर्व रस्त्यावरव रस्त्यामध्ये घाट किंवा घाटावर, सर्व धक्क्यावर व धक्क्यामध्ये आणिसार्वजनिक स्नानांच्या, कपडे धुण्याच्या व उतरणेच्या जागांच्या ठिकाणी व जागामध्ये, देवालय आणि इतरसर्व सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखणेसाठी योग्य ते आदेश देणे. कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्याजवळ ढोल, ताशे व इतर वाद्ये वाजविण्याचे व गाणी गाण्याचे, शिंगे व इतर कर्कश वाद्ये वाजविण्याचे विनियमन करणे व त्यावरनियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ते आदेश देणे. कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी लोकांना उपद्रव होऊ नये म्हणून ध्वनिक्षेपकाचा उपयोग करणेचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ते आदेश देणे.
सक्षम प्राधिकाऱ्यांनी या अधिनियमांची कलम 33, 35, 37 ते 40, 43 व 45 या अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधिन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य आदेश देणे.हा आदेश लागू असे पर्यंत नांदेड जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस स्थनकांचे प्रभारी अधिकारी वसर्व बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी यांचेकडून रहदारीचे नियमन व मार्गाबाबत सूचना कार्यक्रमाची तारीख, वेळ, जाहिरसभा, मोर्चे, मिरवणूक, निर्दशने, पदयात्रा इत्यादी कार्यक्रम संबंधीत पोलीस उपनिरीक्षक किंवा त्यांच्या वरिष्ठांकडून तारीख व वेळ सभेची जागा मिरवणुकीचा, मोर्चाचा मार्ग व त्यात दिल्या जाणाऱ्या घोषणा, पूर्वपरवानगी शिवाय आयोजीत करु नये. संबंधीत अधिकारी यांनी दिलेले आदेशाचे पालन करावेत. जाहीर सभा, मिरवणुका, पदयात्रेत, समयोजित घोषणा सोडून किंवा ज्या घोषणांची शांतता व सुव्यवस्थेला बाधा होऊ शकते अशा घोषणा देऊ नये.हा आदेश लग्नाच्या ठिकाणी, प्रेत यात्रेस लागू नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 134 प्रमाणे अपराधास पात्र ठरेल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक संदिप कर्णिकयांच्या आदेशात म्हटले आहे.