सदाभाऊ खोत यांच्या प्रकृतीत बिघाड

0
7
बुलडाणा, दि. 15 – कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्याने  त्यांना चिखली येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.   कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत शनिवार व रविवार व-हाडच्या दौ-यावर होते.शनिवारी अकोला येथे त्यांनी सभा घेतली. त्यानंतर दुपारी वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात त्यांची कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या समवेत सभा पार पडली. त्यानंतर सायंकाळी त्यांनी बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथे सभा घेतली. ही सभा पार पडल्यानंतर ते चिखली येथे मुक्कामासाठी निघाले. यावेळी त्यांच्यासोबत वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर होते.मात्र डोणगाववरून चिखलीला येत असताना अचानक त्यांची प्रकृती खालावली. त्यांना उलट्यांसोबत श्वास घेताना त्रास होऊ लागला.  त्यामुळे त्यांना चिखली येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.