जिल्ह्यात खाजगी दवाखान्यात दाखल होणाऱ्या रुग्णांना पाण्यासाठी भटकंती

0
23

नांदेड,दि.10- जिल्ह्यात विविध आजाराने ग्रस्त असलेले रुग्ण शहरात दाखल होत आहे, वाढता उन्हाचा पारा त्यामुळे लागलेली तहान ज्या भी खाजगी दावखण्यात दाखल होत आहेत तेथे पिण्याच्या पाण्याची वानवा असून त्यांना तहान भागविण्यासाठी विकत पाणी घेऊन तहान भागवत आहेत तर जे व्यक्ती खरेदी करण्याची ऐपत नाही अशारुग्णांनी पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहेत.
नांदेड शहरात एकूण चाळीस ते पनासच्या जवळ मल्टिस्पेशॅलिटी व इतर अन्य छोटे मोठे हॉस्पिटल संख्या शंभर च्या असून मेडिकल संख्या तेवढीच आहे.नांदेड जिल्हा हा तेलंगणा व कर्नाटक च्या शेजारील राज्य आसल्याने येथे रुग्णाची रेलचेल जास्त असते. यामुळे येथील औषधी व्यापार देखील डोळे दिपून टाकणारा आहे .औषधी क्षेत्रातील राज्यात सर्वात जास्त उलाढाल असणारा हा जिल्हा.

नांदेड जिल्ह्यात जेवढी काही हॉस्पिटल व औषधी दुकाने आहेत यामध्ये पनास टक्यांची वर तर डॉक्टरची औषधी दुकाने आहेत. तर काही जागी मोठे व्यापारी फार्मासिस्ट सिर्टीफिकेट हे भाडे घेऊन चालवतात यामध्ये नांदेड शहरात तर प्रमाण साठ ते सत्तर टक्के आहे.आज जिल्ह्यात तापमान 42 डिग्री वर पोहचले असून उष्णतेने सामान्य माणूस पाणी पाणी करत आहे यात रुग्णाचे काय हाल होत असतील हा विचार केलेला न बरा?यामुध्ये हॉस्पिटल मध्ये येणाऱ्या रुग्णांना संपूर्णपणे पिण्याच्या पाण्याची सोय करणे संबधित हॉस्पिटल ची जीमेदारी असताना येथे चित्र मात्र वेगळे दिसत आहे पिण्याच्या पाण्याची सोय करत नसून तहान लागलेल्या रुग्णांना अथवा त्यांच्या नातेवाईक यांना औषधी दुकानातून पाणी घ्या असाही सला देत आहेत यामुळे पाच ते सहा रुपयाला येणारी पाण्याची बोतल पंधरा ते वीस रु रुग्णाला नाईलाजाने घावे लागत आहे.यामध्ये महिलांच्या सोनोग्राफी व अथवा पोठाशी संभतीत विकार असताना तर पाण्याची भरपूर गरज लागते अशावेळी रुग्णाला नाईलाजस्तव डबल भुरदण्ड बसत आहे
अशा वेळी एकीकडे व्यापारी व समाजसेवी संस्था लोकांना पाण्याची तहान भागावी म्हणून पिण्याच्या रोडवर अथवा आपल्या प्रतिष्ठान समोर पाण्याच्या विविध प्रकारे सोयकरत असताना आहेत इथे मात्र चित्र आहे उलट ज्यांच्या भराशवर रुग्णदाखल होत आहेत तेच डॉक्टर शहरातील खाजगी हॉस्पिटल आपलाच धंदा डबल वाढवा या हेतूने पाण्याची सोय करत नसल्याची रुग्णांकडून चर्चा आहे याकडे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी यांनी जातीने लक्ष घालून संबधित विभागास सूचना करावे असे रुग्णांकडून मागणी होत आहे