मुख्यमंत्र्यांना उस्मानाबादेत दाखवले काळे झेंडे

0
13
उस्मानाबाद,दि.13 – मराठवाड्याच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांचा युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून निषेध केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी उस्मानाबाद जिल्ह्यातील शेततळी कामांची पाहाणी करण्यासाठी आले होते. यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी कर्जमाफीच्या घोषणा देत काळे झेंडे दाखवून राज्य शासनाचा निषेध केला. पोलिसांनी उमेशराजे निंबाळकर, अवधूत क्षीरसागर, रोहन जाधव, रोहित थिटे, पद्माकर डोंबळे यां कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. देवेंद्र फडणवीस शनिवारी जालना जिल्ह्याचाही दौरा करणार असून या पार्श्वभूमीवर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.  
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेनेचे खासदार रविंद्र गायकवाड यांच्यासह शनिवारी सकाळी उस्मानाबाद मधील वाशी तालुक्यातील पारडी येथे शेततळ्याची पाहाणी करण्यासाठी आले होते. मुख्यमंत्र्यांचे पारडी येथे आगमन होताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी शेतकरी कर्जमाफीच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यासोबतच काही कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार करुन त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलक अधिक आक्रमक असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी शेततळी पाहणी कार्यक्रम उरकता घेतला.  यावेळी त्यांच्यासोबत सुभाष देशमुख, संभाजी पाटील निलंगेकर, महादेव जानकर होते.