ऑनलाइन’च्या विरोधात औषध विक्रेत्यांचा बंदला संमिश्र प्रतिसाद

0
26

नांदेड,दि.31-केंद्र सरकारने औषध विक्री व्यवसायात ऑनलाइनद्वारे विक्री करण्याचा फॉर्म्युला स्वीकारण्याचे संकेत दिल्याने त्यासंदर्भात केंद्र सरकारने जाहीर नोटीस जारी केली आहे. त्या नोटिशीबरोबर सरकारच्या धोरणाविरोधात आवाज उठविण्यासाठी देशभरातील औषध विक्रेत्यांनी ३० मे रोजी बंद पुकारला होता. या संपात महाराष्ट्र सह नांदेड जिल्ह्यातील औषधी विक्रते सहभागी झाले होते. यामध्ये पण दोन गट दिसून आले जिल्ह्यातील अर्धाधिक दुकानदार केमिस्ट अँड ड्रगिस्ट प्रबल संघटनेशि सम्भादित आहेत यामध्ये संघटनेटिल पदधिकारयनिच इकडे संपमध्ये सहभागी दाखवत आपल्या हस्तकमार्फत दुकानी औषधी विक्री करत होती तर छोटे छोटे दुकानदार हे एमर्जेन्सी च्या नावाखाली औषधी घरपोच देत होती.
डॉक्टर अटैच असणारी कॉउंटर हे चालू बंद करत औषधी विक्री केलि यामुळे बहेरगवहुन्न येणारी रुग्ण मंडळी याना औषधी सहजपणे उपलब्ध होत होती यामुळे जिल्ह्यातील बंदला संम्पला समिश्र प्रतिसाद मिळाला.देशातील आठ लाख; तर महाराष्ट्रातील ६० हजार औषध विक्रेते सहभागी झाले होते यामध्ये जिल्ह्यातील दीड ते दोन हजार औषधी विक्रते सहभागी होते.

महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून ई-फार्मसीच्या माध्यमातून बेकायदेशीर औषध विक्रीचा व्यवसाय सुरू आहे. या संदर्भात राज्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली केंद्राने समिती स्थापन केली होती. त्या समितीने त्या संदर्भात नुकताच केंद्राला अहवाल दिला आहे. त्या अहवालात देशात ऑनलाइनद्वारे औषध विक्रीचे धोरण राबविण्याची शिफारस केल्याचे समजते. त्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक कंपन्यांकडून ऑनलाइनद्वारे औषध विक्री बेकायदेशीररित्या सुरू असून, त्याचा फटका औषध विक्रेत्यांना बसत आहे
ऑनलाइन औषध विक्रीमुळे प्रतिजैविकांचा वापर वाढण्याची शक्यता असून, त्याचा दुरुपयोग होण्याची भीती आहे. कमी दर्जाच्या, अप्रमाणित, बनावट औषधांची बाजारात विक्री होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तरुणाईमध्ये नशेसह लैंगिक उत्तेजक औषधांचा वापर वाढण्याची शक्यता आहे. डॉक्टरांच्या प्रीस्क्रिप्शनशिवाय औषध घेण्यास मनाई असताना सुद्धा ऑनलाइनद्वारे विविध अॅँटीबायोटिक्ससह अन्य औषधांची खरेदी विक्री होणार आहे.ऑनलाइन औषध विक्रीमुळे सध्या देशात असलेल्या आठ लाख औषध विक्रेत्यांच्या कुटुंबावर बेकारीची कुऱ्हाड कोसळण्याची भीती आहे. यामुळे ऑनलाइन औषध विक्रीच्या धोरणाला विरोध करण्यासाठी ३० मे रोजी देशात औषध विक्रेत्यांनी बंद पुकारण्याचा निर्णय घेतला होता अशा विविध कारणांमुळे आजचा बंद पुकारण्यात आला होता पण संघटनेतील वरिष्ठना दाखन्यासाठी एकीकडे निवाशी जिल्हाधिकारी जयराज कारभारी याना निवेदन देऊन संपात दाखल आहोत असे दाखवत होते तर त्याच संघटेनिल पदाधिकारी यांनी आपली प्रतिष्ठाणे उघड़ी ठेऊन आपला व्यवसाय करताना दिसत होते यामुळे मात्र छोटे दुकानदार ज्याच्यमुळे संघटना मजबूत होती त्यांची मात्र आजच्या बंदमुळे नुकसान झाल्याची चर्चा होत होती.