शेतकरी संपावर शरद पवार म्हणाले; आज मी अस्वस्थ आहे

0
12

पुणे, दि.1 –  राज्यभरातील शेतकरी आज संपावर आहेत. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी शेतमाल रस्त्यावर ओतून निषेध नोंदवला.बळीराजा रस्त्यावर उतरला आहे, त्यामुळे आज मी अस्वस्थ असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. पुण्यात आयोजित महिला आरक्षण कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते.. ”देशातील-राज्यातील शेतकरी संकटात आहे. रस्त्यावर उतरुन संघर्ष करत आहेत. अशा वेळी केंद्र व राज्य सरकार शेतकरी हिताचा निर्णय घेतील”,  अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली.

राज्यातील शेतकरी आजपासून 7 दिवसांसाठी संपावर गेला आहे. राज्यात ठिकठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. त्यांच्या प्रश्नांची केंद्र आणि राज्यातील नेतृत्वाने सोडवणूक करण्याची गरज असल्याचे पवार म्हणाले.शरद पवार म्हणाले, आज मी अस्वस्थ आहे. बळीराजा रस्त्यावर उतरला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जे-जे करावे लागले ते राज्यातील आणि केंद्रीतील नेतृत्वाने केले पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने बळीचे राज्य येईल.पवार म्हणाले, दरवर्षी 12 हजार शेतकरी आत्महत्या करतात, हेच वातावरण दुरुस्त होण्याची गरज आहे. राजकीय अभिनिवेष बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याची गरज यावेळी पवारांनी व्यक्त केली.