वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओतलं 155 लिटर दूध

0
10
वर्धा, दि. 1 – कर्जमाफीच्या मागणीसाठी राज्यातील शेतकरी आक्रमक झाला आहे. शेतकऱ्यांनी आजपासून पुकारलेल्या संपामध्ये सहभागी होत वर्धेतील दूध उत्पादकांनी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत तब्बल 155 लिटर दूध ओतले.
शेतकऱ्यांचा संप सुरू असेपर्यंत हे दूध फेकण्याचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले. राज्यात पुकारलेल्या संपाचा वर्धेत विशेष परिणाम नसला तरी या दूध उत्पादकांनी आपण या संपात सहभागी असल्याचे सांगितले.