24.1 C
Gondiā
Sunday, August 16, 2026
Home महाराष्ट्र वीज अंगावर पडून पाच महिला ठार

वीज अंगावर पडून पाच महिला ठार

0
19

उमरी तालुक्यातील कारला येथील घटना

नांदेड दि.12-पेरणीपूर्व मशागतीचे कामे करण्यासाठी शेतामध्ये गेलेल्या महिलांच्या अंगावर वीज कोसळली. यात पाच महिलांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सोमवारला दुपारी साडेचारच्या सुमारास उमरी तालुक्यातील कारला परिसरात  घडली. या घटनेने हळहळ व्यक्‍त होत असून संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
उमरी तालुक्यातील कारला येथील आस्वल दरीचा माळ परिसरात पेरणीपूर्वीचे कामे करण्यासाठी श्री. भुताळे यांच्या शेतामध्ये गेल्या होत्या. दुपारपासून ढगाळ वातारण निर्माण झाले होते. चारच्या सुमारास विजांच्या कडकटासह पावसाला सुरुवात झाली. शेतामध्ये काम करणार्‍या पाच महिलांनी झाडाखाली असरा घेतला. इतक्यात झाडावर वीज कोसळली. यात जागीच पाचही महिलांचा मृत्यू झाला. यात रेखा मारोती पवळे, शोभा संभाजी पवळे, शोभा देविदास जाधव, मोहनाबाई गंगाधर सोनवने, शेषाबाई माधव गंगावने या पाच महिलांचा जागीच मृत्यु झाला. या घटनेमुळे कारला गावासह उमरी तालुक्यावर शोककळा पसरली आहे. उमरी तहसील कार्यालयाने पाचच्या सुमारास शेतावर येऊन पंचनामा केल्याचे सांगण्यात आले.