सातारा : साताऱ्याच्या माण तालुक्यात पवनचक्कीच्या कामादरम्यान जिलेटीनच्या कांड्यांचा स्फोट झाला. या स्फोटात तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे तर पाच कामगार जखमी आहेत.
बोथे परिसरात पवनचक्कीचं काम सुरु असतानाचा सकाळी अकराच्या सुमारास हा स्फोट झाला.यावेळी घटनास्थळी आठ कामगार काम करत होते.
या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की एक किलोमीटर परिसरातील घरांचं नुकसान झालं आहे. तर स्फोटामुळे उठणारे धुराचे लोळ 10 किलोमीटरवरूनही दिसत होते, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे.
स्फोटातील जखमींवर जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.