भ्रष्ट सरकारी बाबूंची संपत्ती जप्त करण्याचे आदेश

0
16

मुंबई : आघाडी सरकारच्या काळात ज्या सरकारी बाबूंवर भ्रष्टाराचाराचे आरोप झाले, त्यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे या सरकारी बाबूंचं धाबं दणाणले आहे.

आघाडी सरकारच्या काळामध्ये अनेक सरकारी अधिकाऱ्यांची लाचखोरीची प्रकरणं पुढे आली होती. पण या सर्व अधिकाऱ्यांवर ठोस कारवाई झाली नव्हती. मात्र आता आठ भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी लाचलुचपत विभागाला दिले आहे.

या अधिकाऱ्यांमध्ये रायगडचे उप-जिल्हाधिकारी नितीश ठाकूर, पुणे ग्रामीण पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर यांच्यासारख्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

त्यामुळे नेत्यांच्या चौकशीचे आदेश दिल्यानंतर सरकारची सरकारी बाबूंविरोधात फडणवीस सरकारची मोठी कारवाई असल्याचं म्हटलं जात आहे.

या अधिकाऱ्यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश

नितीश ठाकूर, उप जिल्हाधिकारी, रायगड
संपत्ती – 14 लाख 338 रुपये

भाऊसाहेब आंधळकर, पोलिस निरीक्षक, पुणे ग्रामीण
संपत्ती – 98 लाख

पंढरी कावळे, मुख्याध्यापक, गडचिरोली
संपत्ती – 71 लाख

विनोद निखाते, क्लर्क, चंद्रपूर
संपत्ती – 12 लाख

दादाजी खैरनार, उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, दिंडोरी
संपत्ती – 23 लाख

अशोक मान, वरिष्ठ सहाय्यक, ससून रुग्णालय, पुणे
संपत्ती – 21 लाख

विजयकुमार बिराजदार, प्रभाग अभियंता, जलसंपदा विभाग, लातूर
संपत्ती – 38 लाख

नितीश पोद्दार, कंपाऊंडर, प्राथमिक आरोग्य केंद्र, गडचिरोली
संपत्ती 6 लाख