भिमशक्तीच्यावतीने नांदेडमध्ये मुंडण आंदोलन

0
8

नांदेड,दि.०1 :महाराष्ट्र शासन अंगीकृत मागासवर्गियांच्या सर्व महामंडळांच्यावतिने वाटप करण्यांत आलेल्या कर्जाची परिणामाने तात्काळ माफी करावी या मागणीसाठी भिमशक्ती सामाजिक संघटनेचे शहर जिल्हाध्यक्ष प्रशांत इंगोले यांच्या नेतृत्वात विविध संघटनांच्यावतिने आज दि.30 जून रोजी जिल्हाधिकारी नांदेड कार्यालयासमोर मुंडन व धरणे आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यांत आले.यावेळी जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांची एका शिष्टमंडळाने भेट घेऊन प्रशासनास निवेदन दिले.या आंदोलनात प्रशांत इंगोले,विश्वंभर कांबळे सह अनेकांनी स्वतःचे मुंडन केले.
या आंदोलनात भिमशक्तीचे शञुघ्न वाघमारे,बहुजन संघर्ष सेनेचे सुखदेव चिखलीकर, बहुजन टायगर युवा फोर्सचे लक्ष्मणराव मा.भवरे,शाहिर आनंद किर्तने,लालबाजी घाटे,प्रकाश राठोड, प्रितम जोंधळे, गणेश तादलापूरकर,सुरेश हटकर,संजय कवठेकर, शिवराज गायकवाड,भाऊराव भदरगे,मधुकर गच्चे,संजय निळेकर,संतोष नातेवार आदींसह भिमशक्ती व विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.