अजित पवारांच्या नेतृत्त्वात जळगावात तर पुण्यात सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात मुर मोर्चा

0
10

पुणे, दि. 13 -अहमदनगरमध्ये कोपर्डीतील निर्भयाच्या घरासमोर तिचे स्मारक बांधण्यात आले आहे. त्याचे नाव युगंधरा स्मारक असे असून गुरुवारी कडेकोट बंदोबस्तात येथे सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली कोपर्डी घटनेला एक वर्षे झाले तरी अद्याप अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा निर्घून हत्त्या करणा-यांंना नराधमांना शिक्षा देण्यास सरकार अपयशी ठरले आहे. त्यात आता पीडीत मुलीच्या स्मारक होण्याची चर्चा सुरु आहे. ही अंत्यत दुदैवी बाब असल्याचे मत खासदरा सुप्रिया सुळे यांनी पुण्यात आयोजित केलेल्या मुक मोर्चानंतर व्यक्त केले.
कोपर्डी घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे.त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभरात मुक मोर्चा चे आयोजन करण्यात आले.पुण्यात देखील खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालयावर तोंडाला काळया पट्ट्या बांधून मोर्चा काढण्यात आला.मोर्चामध्ये पुणे जिल्हाराष्ट्रवादी काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष जालींदर कामठे, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे, महिला अध्यक्षा वैशाली नागवडे, अर्चना घारे, मानसिंग पाचुंदकर, जितेंद्र इंगवले, अश्विनी खाडे उपस्थित होते
जळगाव, दि. 13 – अमानुष अत्याचारानंतर शाळकरी मुलीची हत्या झाल्याच्या घटनेने वर्षभरापूर्वी संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला होता. ‘कोपर्डी’ची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून दिलेली आश्वासने मात्र अजून पूर्ण झालेली नाहीत. गावाला वर्षभरात ना माध्यमिक विद्यालय मिळाले, ना आरोग्य उपकेंद्र. पोलीस चौकी कागदोपत्री मंजूर झाली; पण प्रत्यक्षात उभी राहिलेली नाही. महत्त्वाचे म्हणजे या घटनेला वर्ष लोटूनही अद्याप नराधमांना शासन झालेले नाही.या मोर्चामध्ये विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष स्मिता पाटील, आमदार डॉ.सतीश पाटील सहभागी झाले होते.
साता-यात राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीचा मूकमोर्चा
कोपर्डी बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपींना अद्याप शासन झालेलं नाही. त्याचबरोबर या खटल्याचे कामकाज आश्वासन देऊनही फास्ट ट्रॅक कोर्टात होत नाही. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने गुरुवारी साता-यातून मूकमोर्चा काढण्यात आला.
नवी मुंबईतही निषेध मोर्चा
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी तर्फे नवी मुंबईतही कोपर्डी घटनेचा मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला. वाशी येथील शिवाजी चौकात हा निषेध मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात आली