नवी दिल्ली : भारतीय प्रशासकीय सेवेच्या १९९३ च्या महाराष्ट्र तुकडीच्या प्रशासकीय अधिकारी आभा शुक्ला यांनी मंगळवारी निवासी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला.
भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, आदिवासी विकास विभागाच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. वस्त्रोद्योग विभागाच्या संचालक तसेच नागपूरच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून जबाबदारी पार पाडल्यानंतर प्रतिनियुक्तीवर २००८ मध्ये श्रीमती शुक्ला नागरी विमान वाहतूक मंत्रालयात दिल्ली येथे संचालक पदावर रूजू झाल्या होत्या. केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण विभागामध्ये सह सचिव म्हणून उत्तम कामगिरी पार पाडली.
बिपीन मल्ल्कि यांना निरोप
महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव तथा निवासी आयुक्त बिपीन मल्लिक यांना मंगळवारी महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात निरोप देण्यात आला. श्री. मल्लिक यांची केंद्र सरकारच्या कामगार व रोजगार मंत्रालयाच्या सह सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली.
कोपरनिकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात श्री. मल्लिक यांना निरोप देण्यात आला. यावेळी अपर निवासी आयुक्त समीर सहाय, महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे, सहायक निवासी आयुक्त (राजशिष्टाचार) नितीन शेंडे, सहायक निवासी आयुक्त (संपर्क) संध्या पवार, सहायक निवासी आयुक्त (प्रशासन) संजय आघाव यांच्यासह महाराष्ट्र सदनातील तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात श्री मल्लिक यांना निरोप देण्यात आला. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी यावेळी पुष्पगुच्छ देऊन मल्ल्कि यांना शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापक विजय कपाटे, परिचय केंद्राच्या माहिती अधिकारी अमरज्योत कौर अरोरा यांच्यासह अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.