शिर्डी विमानतळाचे राष्ट्रपतींच्या हस्ते लोकार्पण

0
11

शिर्डी,दि.01 –  शिर्डी येथे उभारण्यात आलेल्या विमानतळाचे  राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते रविवारी सकाळी लोकार्पण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू हे उपस्थित होते.
शिर्डीजवळील काकडी येथे हे विमानतळ उभारण्यात आले आहे.  आज सकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या विमानतळाचे लोकार्पण केले. आता राष्ट्रपती, राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिर्डीत साईशताब्दी महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. मुंबई ते शिर्डी हा प्रवास  आता 40 मिनिटांत पार करता येणार आहे.