विकासाच्या मुद्द्याला नांदेडच्या जनतेचा पाठिंबा- अशोक चव्हाण

0
11

मुंबई,दि.12- नांदेडच्या जनतेने विकासाच्या मुद्द्याला पाठिंबा दिला असून नांदेडमध्ये खालच्या पातळीवर प्रचार करणाऱ्यांना चांगलीच चपराक बसल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे. नांदेड महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली असून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना गड राखण्यात यश आलं आहे. नांदेडमध्ये काँग्रेसला मिळालेल्या यशाबद्दल प्रतिक्रिया देताना अशोक चव्हाण यांनी नांदेडकरांचे आभार मानले आहेत तसंच भाजपावर सडेतोड टीकाही केली आहे. नांदेडच्या जनतेने विकासाच्या मुद्द्याला पाठिंबा दिल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हंटले आहे.