नरभक्षक वाघिणीला ठार मारण्यासाठी कोर्टाचा हिरवा कंदील

0
15

नागपूर,दि.12:– नरभक्षक वाघिणीला गोळ्या घालण्याच्या आदेश हायकोर्टाने या आधी दिले होते. या संबंधाने या निर्णयाला आव्हान देणारी याचिका कोर्टात दाखल करण्यात आली होती. आदेशापर्यंत वाघिणाला मारणार नाही, असे वनविभागाने हायकोर्टाला तोंडी आश्वासन दिले होते. हायकोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकला आणि आज सकाळी यावर आपला निर्णय देत नरभक्षक वाघिणीला ठार मारण्याचे आदेश दिले.ही वाघीण 500 किलोमीटरचे अंतर कापून आलेली आहे.