भाजपाच्या केंद्रीय मंत्र्याची जीभ घसरली, टीका करताना यशवंत सिन्हांना म्हटले गद्दार

0
19

नवी दिल्ली,दि.12(वृत्तसंस्था) – देशाची अर्थव्यवस्था आणि केंद्र सरकारच्या कारभारावरून मोदी सरकारवर टीका करणारे माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्याविरोधात केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो हेही सामील झाले आहेत. यशवंत सिन्हा यांनी काश्मीरमधील फुटीरतावाद्यांची भेट घेतल्यानंतर सुप्रियो यांनी त्यांना टीकेचे लक्ष्य केले असून, देशद्रोही, गद्दार असा त्यांचा उल्लेख केला आहे.
मोदी सरकारला देशाच्या आर्थित स्थितीवरून धारेवर धरणाऱ्या यशवंत सिन्हा यांनी जय शहा यांच्या संपत्तीवरुन भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. “जय शाह प्रकरणात भाजपाने आपली नैतिकता गमावली आहे. ज्यापद्धतीने केंद्रीय मंत्री त्यांच्या बचावासाठी उभे राहत आहेत, त्यावरून डाळीत काहीतरी काळे असल्याचे सिद्ध होत आहे.” अशी शंका यशवंत सिन्हा यांनी उपस्थित केली होती.
दरम्यान या टीकेला बाबुल सुप्रियो यांनी ट्विटरवरून प्रत्युत्तर दिले आहे.”यशवंत सिन्हा हे काय करत आहेत. त्यांच्याकडे भाजपाला देण्यासारखे आता काही नाही. मात्र आमच्यासारख्या नव्या पिढीला त्यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देण्याचा पूर्ण हक्क आहे. ते आमचेच नुकसान का करत आहेत? असा सवाल त्यांवी उपस्थित केला.
पियूष गोयल हे रेल्वेमंत्री असण्याऐवजी जय शाह यांच्या कंपनीचे चार्टर्ड अकाऊंटंट असल्यासारखे बचाव करताहेत. जय शाह यांच्या टेम्पल इंटरप्रायजेस लिमिटेडमध्ये घोटाळा झाला असल्यास ते चौकशीअंती समोर येईल, परंतु पियूष गोयल यांच्यासह उत्तर प्रदेशचे एक मंत्री व अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ज्या पद्धतीनं कंपनीच्या बाजूने उभे राहिले. त्यामुळे मला धक्काच बसला आहे, असं यशवंत सिन्हा म्हणाले आहेत.
केंद्रीय मंत्र्यांच्या अशा वागणुकीमुळे जनतेमध्ये भाजपाची प्रतिमा मलिन होतेय. यशवंत सिन्हा म्हणाले, जय शाह यांच्या कंपनीची ज्यांच्याशी देवाण-घेवाण झाली, ते मला मीडियामधूनच समजले. परंतु एका नागरिकाच्या बचावासाठी केंद्रीय मंत्री ज्या पद्धतीने समोर येतात ते चिंताजनक आहे. या उलाढालीत कदाचित कोणताही गैरव्यवहार नसेलही, जय शाह हे स्वतः व्यापारी आहेत. ते स्वतःचा बचाव स्वतः करू शकतात. जय शाह यांनी बदनामीचा फौजदारी खटला भरला आहे. त्यांचा बचाव अतिरिक्त सॉलिसिटर जनरल करणार आहेत. सरकारचे कायदा विषयक सल्लागार असतानाही अतिरिक्त सॉलिसिटर जनरल जय शाह यांचा खटला लढतायत. सॉलिसिटर जनरलपदाचा दुरुपयोग करूनही त्यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही, असेही सिन्हा म्हणाले आहेत.