राज्यात साडेचार हजार डॉक्टरांची नोंदणी रद्द

0
9
मुंबई,दि.14-मेडिकल अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर डॉक्टरांना ग्रामीण भागात १ वर्षाची सेवा बंधनकारक असते. मात्र या नियमाचे पालन न केल्याचा ठपका ठेवून राज्यातील सुमारे चार हजार ५०० डॉक्टरांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाने घेतला.२००५ ते २०१२ या कालावधीत राज्यातील साडेचार हजारांहून अधिक डॉक्टरांनी एमबीबीएसची पदवी प्राप्त केली. त्यात मुंबई वैद्यकीय महाविद्यालयांमधील २५०० डॉक्टरांचा समावेश आहे. मात्र, त्यांनी ग्रामीण भागात सेवा दिली नाही किंवा दंड भरला नाही. सेवा न दिल्यास एमबीबीएस डॉक्टरांसाठी १० लाख, पदव्युत्तरसाठी ५० लाख आणि सुपर-स्पेशालिटी डॉक्टरांसाठी २ कोटी रुपये दंड आहे.
ग्रामीण भागात सेवा करायची नसेल तर डॉक्टरांना दंड भरावा लागतो. मात्र, दोन्ही होणार नसेल तर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने अशा डॉक्टरांना दिला आहे.