हेमा फाउडेशनच्या ‘दीना’ या लघु चित्रपट प्रकाशन

0
10

पं. दीनदयाळ संपूर्ण वाड्मय चे लोकार्पण १० डिसेंबर रोजी

मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ),दि.09 – ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ, अर्थतज्ञ, विचारवंत आणि इतिहासकार पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्ष च्या अनुषंगाने त्यांच्या कृतीत्व आणि आदर्श जीवनावर पं. दीनदयाळ उपाध्याय संपूर्ण वाड्मयाचे प्रकाशनाच्या संदर्भात मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषद मध्ये पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या वर बनविण्यात आलेली लघु चित्रपट ‘दीना’ चे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी महेंद्र काबरा म्हणाले की, १० डिसेंबर रोजी बिरला मातुश्री सभागार येथे पं. दीनदयाळ उपाध्याय संपूर्ण वाड्मयाचे प्रकाशन समारंभ करण्यात येईल. यावेळी पूज्यगुरुदेव गोविंददेव गिरीजी, रेल्वेमंत्री पियुष गोयल, गोवाचे राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा आदी उपस्थितीत राहतील. हेमा फाउंडेशनच्या आपल्या लघु चित्रपटाच्या माध्यमातून भारताच्या अनेक राष्ट्रीय व सांस्कृतिक वारसा मुलांना मिळावा यासाठी पुढाकार घेत आहे. हेमा फाउंडेशनचे प्रमुख विश्वस्त महेंद्र काबरा यांनी या लघु चित्रपटाच्या ठळक मुद्यावर प्रकाश टाकत म्हणाले की, समाजातील नैतिक मुल्यांची आवश्यकता लक्ष्यात घेत हेमा फाउंडेशन शिक्षणा सोबत संस्कार देणे यावर कार्य करीत आहे. प्रेरणादायी व्यक्ती महत्व असलेले महापुरुषांच्या आदर्शवादी बाळपणावर सीडी बनवून जातीजास्त मुलांपर्यंत पोचविण्याच्या प्रयत्न करीत आहे. यावर्षी ३२ लघु चित्रपट बनविण्यात आल्या आहेत. लघु चित्रपट हे प्रेरणादायी विषयवस्तू च्या माध्यमातून विकसित करण्यात आली आहे. ते म्हणाले की, जर कोणती शाळा या मुल्यांवर शिक्षणाचा एक तास ठेवू इच्छित असेल तर ते पूर्ण पणे निशुल्क व्यवस्था करण्यात येईल. फाउंडेशन विश्वस्त व क्रिएटीव प्रमुख अनिता माहेश्वरी यांनी विमोचन सोहळा आणि हेमा फाउंडेशन विविध बाबींवर सविस्तर माहिती दिली.