काँग्रेसमध्ये येण्याच्या तयारीत होते रावसाहेब दानवे – ठाकरे

0
6

नागपूर : भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविषयी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी गौप्यस्फोट केला असून जेव्हा केंद्रात रावसाहेब दानवे यांना मंत्रिपद मिळाले नसल्यामुळे ते नाराज होते, आणि त्यानंतर ते भाजपला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये येण्याच्या तयारीत होते, असे माणिकराव ठाकरे यांनी म्हटले आहे.

नुकतीच भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रावसाहेब दानवे यांची निवड झाली असून रावसाहेब दानवे यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडण्यास सुरूवात केली आहे, त्या दरम्यान माणिकराव ठाकरे यांनी हा गौप्यस्फोट केल्याने रावसाहेब दानवे त्यांना काय उत्तर देतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.