संत साहित्यच माणसाला जवळ आणु शकते-ना.राजकुमार बडोले

0
13

नांदेड-जगाच्या कानाकोपर्‍यात भौतिक वाद, जातिय वाद, दहशत वाद, वंश वाद, मोठ्या प्रमाणात वाढला असून माणुस माणसापासुन दुर जात आहे. माणसाला माणसाजवळ आणायचे असेल तर संत विचार, संत साहित्य आणु शकते असा विश्वास राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केला.

नांदेड येथील गुरू ग्रंथ साहिब भवन मध्ये तीन दिवसीय 4 अखिल भारतीय मराठी संतसाहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले बोलत होते. यावेळी संत संमेलनाच्या व्यासपीठावर राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, शिवसेनेचे आ. हेमंत पाटील, आ. प्रताप पाटील चिखलीकर, आ. राजेंद्र नजरधनी, संमेलनाध्यक्ष डॉ. शिवाजीराव माहिते, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. सदानंद मोरे, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष तथा संयोजक हभप विठ्ठल पाटील, भाजपाचे राम पाटील रातोळीकर, बाबाराव एंबडवार, माणिक गुट्टे, ग्यानी आवतारसिंध शितल यांच्यासह राज्यातील विविध भागातुन आलेले वारकरी संप्रदायाचे संत उपस्थित होते.

पुढे बोलताना राजकुमार बडोले म्हणाले की, संत विचाराची व साहित्याची देशाला गरज आहे. आजचा तरूण संत साहित्यापासून दुर गेला आहे. या तरूणाला संताच्या विचारांच्या प्रवाहात आणने गरजेचे झाले आहे. महाराष्ट्र ही संताची भुमी असून संताचे स्वप्न आमचे सरकार नकिच पुर्नत्वास नेईल असा विश्वास त्यंानी व्यक्त केला. गुरू गोविंदसिंघ यांच्या पावन भूमीत संत साहित्य संमेलन हजारो वारकर्‍यांच्या उपस्थितीत होत आहे ही बाब अभिमानस्पद आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारचे संमेलने मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे. चांगल्या माणसामुळे संत परंपरा टिकुण आहे. परंतु शासनाची स्थिती रेड्या सारखी झाली आहे. सरकार बदले परंतु अधिकारी तेच असल्याने अनेक वेळा अडथळे निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगीतले.

पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर बोलतांना म्हणाले की, राज्यातल्या तमाम हिंदु समाजाला एकत्र आणन्याचे काम या संमेलनातुन झाले. किर्तन, भागवत कथा, प्रवचन आदी माध्यमातुन समाजाला दिशा देण्याचे काम ही वारकरी मंडळी करत असतात. जे समाजापासून व धर्मापासून दुर गेलेत त्यांना एकत्र आणन्याचे काम तुम्हाला व आम्हाला करावयाचे आहे. आणि संताचा वारसा पुढे न्यावयाचा आहे. गाव स्वच्छतेची मोहिम त्या काळात संत गाडगे बाबानी सुरू केली. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संत गाडगे बाबांचे अपुर्ण राहिलेले स्वप्न पुर्ण करण्याचा विडा उचलला आहे. धार्मिक स्थळे, देवालय आदी ठिकाणी घाणीचे साम्राज्य करू नये असा संदेश देत पिण्याचे शुध्द पाणी नागरीकांना मिळाले पाहिजे यासाठी स्वच्छतेचा संदेशही देणे गरजेचे आहे. वारकरी संप्रदायातील कोण्याही व्यक्तीचा प्रशासकिय अधिकार्‍याकडून जर आपमान होत असेल तर सरकार त्यांना माफ करणार नाही असा इशाराही लोणीकर यांनी दिला. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. सदानंद मोरे, आ. हेमंत पाटील, आ. प्रताप पाटील, माणिक गुट्टे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात संत वारकरी मंडळींचा पुरस्कार देवुन सन्मान करण्यात आला. सकाळी 7 वाजता नगीना घाट येथुन संत संमेलनाची दिंडी काढण्यात आली. या दिंडीत शाळकरी विद्यार्थी, विद्यार्थींनी, वारकरी मंडळी, 30 दिंड्या, झाकी आदींचा सहभाग होता. विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर करत ही दिंडी कार्यक्रम स्थळी पोंहचली.

कार्यक्रमाचे संयोजक तथा वारकरी साहित्य परिषदेचे प्रदेश अध्यक्ष हभप विठ्ठल पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात बोलतांना सांगीतले की, गुरू गोविंदसिंघ यांच्या भूमीत राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि जिल्ह्याचे जिल्हाधिकारी धिरजकुमार यांच्याकडुन अपमानास्पद वागणुक मिळाली. संताच्या विचाराचा या मंडळीवर परिणाम नाही. संत संमेलनाला अर्थिक मदत तर सोडाच साधी विचारपुसही या मंडळीकडून झाली नसल्याची खंत त्यांनी बोलुन दाखवली. तेराव्या शतकापासून संत, वारकरी संप्रदाय सुरू असून नांदेडच्या या पवित्र भूमीत संत संमेलन होतय याचा मला अभिमान असून येथिल मंडळीनी जरी मला मदत केली नाही तरी ही मी खचलो नाही. सर्व वारकर्‍यांच्या व संताच्या अशिर्वादामुळे कार्यक्रम संपन्न होत आहे.

संमेलन अध्यक्ष व मान्यवरांचे भाषण
————————–
वारकरी संप्रदाय सातशे वर्षाहुन अधिक काळ समाजाच्या सर्व स्तरावर अस्तीत्वात असून आज 21 व्या शतकातही संप्रदायाचे महत्व किंवा उपयोजिता तितकीच महत्वाची असल्याचे मत आखिल भारतीय मराठी संत संमेलनाचे संमेलन अध्यक्ष डॉ. शिवाजीराव मोहिते यांनी व्यक्त केले.

नांदेड येथिल 4 थ्या अखिल भारतीय मराठी संतसाहित्य संमेलनाध्यक्ष म्हणुन ते बोलत होते. महाराष्ट्राच्या भुमित संताचे महत्व अजुनही कमी झालेले नाही. संत नामदेव, संत तुकाराम, संत जनाबाई, संत कबीर, संत गाडगे बाबा यासह अनेक संताचा इतिहास आज समाजाला जिवंत ठेवण्याचे काम करत आहे. रोजच्या जिवनात आलेल्या अडचणी, समस्या, सामाजिक संघर्षाचे प्रश्न सोडविण्याची अभिव्यक्ती संताच्या साहित्यातुन दिसून येते. फेब्रुवारी 2012 मध्ये पहिले संत संमेलन नाशिक येथे, दुसरे मुंबई येथे, तिसरे शेगाव येथे तर चौथे हे नांदेड मध्ये गुरू गोविंदसिंघ यांच्या पावन भुमित होत असल्याने या संमेलनाला एक वेगळे महत्व आल्याचे ते म्हणाले. शिवसेना आ. हेमंत पाटील बोलतांना म्हणाले की, शिवसेना व वारकरी यांचे अतुट नाते आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे कुठलही अडचण घेवुन वारकरी गेला तर ती अडचण नक्कीच सुटायची. इथेही वारकर्‍यांची गैरसोय होणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिवसेना आ. प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले की, संत संमेलनासाठी तुम्ही चुकीच्या माणसाकडे गेलात. त्यांनी तुम्हाला काय मदत करतील आज तेच अडचणीत आहेत. गुरू गोविंदसिंघ यांच्या नावावर आलेल्या कोट्यावधी निधीचा या मंडळीनी दुरउपयोग केला असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे नाव न घेता त्यांनी टोला लगावला. तुमच्या संमेलनाला कुठलीही अडचण येवु देणार नाही असे ही ते म्हणाले.(साभार नांदेडन्युजलाईन)