मनपा निवडणुकीआधीच औरंगाबादचे संभाजीनगर

0
13

औरंगाबाद – आगामी महापालिका निवडणुकीत हिंदू मतांच्या विभाजनाचा धोका पाहून त्याचे ध्रुवीकरण करण्याच्या हेतूने शिवसेना नवा डाव टाकण्याच्या तयारीत आहे. औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव सरकारला पाठवण्याच्या हालचाली आहेत. पर्यावरणमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी मनपाला तशा सूचना दिल्या असून, प्रस्ताव पाठवून निवडणुकीआधीच तो मंजूर करून घेतला जाण्याची शक्यता आहे. उस्मानाबादसह देशातील १३ शहरांचा यात समावेश आहे.भारतावर ११ व्या व १६ व्या शतकात राज्य करणा-या राजांनी स्वत:ची, राजवटीची आठवण म्हणून शहरांचे नामकरण केले. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने सोयीनुसार काही शहरांची नावे बदलली आहेत.