आरोग्य विभागातील रिक्त पदे भरणार

0
8

मुंबई : राज्यातील आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी कार्यवाही करण्यात येत असून, अस्थायी बीएएमएस डॉक्टरांना सेवेत सामावून घेण्याबाबत शासन विचार करीत आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज विधानसभेत दिली.
राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागात डॉक्टरांसह ३० टक्के पदे रिक्त असल्याबाबतचा प्रश्न छगन भुजबळ यांनी उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना डॉ. सावंत म्हणाले की, राज्यात आरोग्य विभागामध्ये २५ टक्के पदे रिक्त आहेत. काही पदे न्यायालयीन खटल्यांमुळे भरता येणे शक्य होत नाही. दरम्यानच्या काळात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरण्याची प्रक्रिया काढून घेऊन विभागामार्फत थेट पदे भरती करण्यात आली आहे. राज्यातील ७८९ अस्थायी बीएएमएस डॉक्टरांना सेवेत सामावून घेण्याचा प्रस्ताव असून, तो मंत्रिमंडळाकडे सादर करण्यात येणार आहे. एका उपप्रश्नाला उत्तर देताना आरोग्यमंत्री म्हणाले की, ग्रामीण रुग्णालयाच्या काही निकषांमुळे त्या ठिकाणी अतिदक्षता विभागाची (आयसीयू) सुविधा करता येणे शक्य होत नाही.या वेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, सदस्य प्रशांत बंब आदींनी सहभाग घेतला