गारपीटग्रस्तांनी मांडल्या भुजबळासमोर व्यथा

0
32

लासलगाव, दि. १५:- राज्यात शनिवारपासून अवकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावली त्यातच नाशिक जिल्ह्यालाही चांगलेच झोडपले असून शनिवारी सायंकाळी निफाड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गारपीट झाल्याने द्राक्ष, कांदा, गहू आदी पिकांचे नुकसान झाले.या नुकसानीची तीव्रता बघून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार छगन भुजबळ यांनी शनिवार रात्री मुंबईच्या प्रवासातूनच माघारी परतून आज रविवारला सकाळी निफाड तालुक्यातील खानगाव, खडकमाळेगाव परिसराला भेट देऊन शेतीची पाहणी केली.वास्तविक शेतकर्यानी शासनाच्या असहकारधोरणाच्या विरोधाता निफाड येथे रेल्वेरोको आंदोलन करुन आपला निषेध नोंदविला.भुजबळानाही शेतकर्यानी गाडीतून नव्हे तर पायी चालत नेऊन पीकाची झालेली नासाडी दाखविली.
शेतकऱ्यांनी भुजबळ यांना माहिती देताना सांगितले की, ५० पैसेपेक्षा कमी आणेवारी असलेल्या भागातीलच पंचनामे प्रशासनाकडून करण्यात आले आहेत. त्यामुळे या भागातील पंधरा दिवसापासून होणाऱ्या नुकसानीचे अद्यापपर्यंत प्रशासनाकडून कोणतेही पंचनामे झालेले नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांत झालेल्या गारपिटीमुळे काही शेतकऱ्यांनी मातीमोल दराने द्राक्ष विकले आहे. त्यानंतर पुन्हा मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने १०० टक्के नुकसान झाले आहे.
याप्रसंगी छगन भुजबळ यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी संपर्क करून सांगून शेतकऱ्यांच्या भावना सांगितल्या. तसेच भुजबळ यांनी जिल्हाधिकारी दीपेद्रसिंग कुशवाह यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करून गेल्या पंधरा दिवसापासून मातीमोल दराने द्राक्ष विकलेल्या तसेच काल गारपीट झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे सरसकट १०० टक्के पंचनामे करण्याच्या सूचना त्यांना दिल्या.