महिला मेळावा व हस्तलिखिताचे प्रकाशन

0
11

गोरेगाव- तालुक्यातील ग्राम सर्वाटोला येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत एकात्मिक बालविकास प्रकल्प अंतर्गत शाळा व अंगणवाडी यांच्या संयुक्तवतीने महिला मेळावा घेण्यात आला.
उद््घाटन जिल्हा परिषदेचे माजी सभापती पी.जी. कटरे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य सीता रहांगडाले होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य ओमप्रकाश कटरे, सरपंच द्रौपदा बावणकर उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
सुगमकर्ता शिक्षिका सूर्यकांता ए. हरिणखेडे यांच्या मार्गदर्शनात मीना राजू मंचच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या : उमलत्या बाल कळ्या : या हस्तलिखिताचे प्रकाशन पी.जी.कटरे व सीता रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आले. पश्‍चात महिला व किशोरवयीन मुलींची संगीत खुर्ची, मेणबत्ती पेटवण, रांगोळी, पाककला, हस्तकला स्पर्धा घेण्यात आली. दरम्यान मीना राजू मंचच्यावतीने गाणी व कन्या भ्रूण हत्येवर आधारित नाटिका असे विविध कार्यक्रम महिला मेळाव्यात घेण्यात आले.संचालन एस.ए. हरिणखेडे यांनी केले. आभार डिलेश्‍वर कटरे यांनी मानले. याप्रसंगी प्रभारी डीपीओ श्रीवास्तव, उपसरपंच शकुन गौतम, मुख्याध्यापक एफ .एन. पटले, शिक्षक वाय.एल. रहांगडाले, सचिव पटले, पर्यवेक्षक दानवे, अरुणा कटरे, शाळेतील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.