भाजपा प्रणित नव भारतीय शिव वाहतूक संघटनेचा शुभारंभ

0
21

 गडकरींचा शिवसेनेला आणखी एक धक्का
मुंबई.,दि.28 ( शाहरुख मुलाणी ) – निवडणुकांचा रणसंग्राम जसजसा जवळ येऊ लागलाय तसतसे शिवसेना भाजपमधील वातावरण तापू लागले आहे, त्यातच भाजपने रविवारी राष्ट्रीय स्तरावरच्या वाहतूक संघटनेची घोषणा करत शिवसेनेला आणखी एक धक्का दिला आहे. माटुंग्याच्या षण्मुखानंद सभागृहात एका भव्य सोहळ्यात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजप प्रणित राष्ट्रीय स्तरावरच्या नवभारतीय शिव वाहतूक संघटनेचा उद्घाटन सोहळा दुपारी पार पडला. याच वेळी सिनेअभिनेत्री ईशा कोपीकरचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश झाला. ईशा कोपीकरला वाहतूक संघटनेचे राष्ट्रीय महिला कार्याध्यक्षपदाचे नियुक्ती पत्र देत केंद्रीय मंत्री गडकरी यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी म्हणाले की, महाराष्ट्रात 5 लाख करोड चे रस्ते बनवत आहोत त्याचा फायदा वाहतुकीला होणार आहे. 6 ते 12 लेनचे रस्ते आम्ही दिल्ली मध्ये बनवत आहोत. ट्रक वाहतूक ही सहज दिल्ली पर्यंत करता येईल, असे दर्जेदार रस्ते भारतात तयार होत आहेत. ट्रक चे इंजिन एथोनॉल वर चालतील असे प्रयत्न सुरू आहेत. वाहतुकीचा प्रश्न कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. ठाणे ते विरार पर्येंत जल वाहतुकीला प्राधान्य  देण्यात येणार असून सध्याच्या वाहतूक यंत्रणेवर पडणारा ताण कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.  आजही आपल्या देशात 22 लाख ड्रायव्हर च नोकऱ्या उपलब्ध आहेत आपल्या देशात 200 किलोमीटरवर एक ट्रक चालतो तर अमेरिकेत 500 किलोमीटरवर एक ट्रक चालतो कारण त्या देशाने या क्षेत्रावर भरीव काम केले आहे. मी हा प्रयत्न करतो आहे की, आपल्या देशात ही दळणवळण या क्षेत्रात काम करून चांगल्या सेवा सुविधा उपलब्ध करून देऊन किमान साडेतीनशे ते चारशे किलोमीटरवर एक ट्रक चालेल यासोबतच रस्ता सुरक्षेसाठी सरकार प्रयत्न करत असून आपण ही प्रयत्न करा असे आव्हान त्यांनी यावेळी केले.
मुळात साडेसात लाख मेंबर्सशिप असलेल्या हाजी अरफात शेख यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक सेना ही शिवसेना प्रणित होती. परंतु राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्याने संघटनेचे नेते हाजी अरफात शेख यांनी भाजपात प्रवेश केला. तेव्हा पासून वाहतूक सेनेबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. भाजपने आता या संघटनेची घोषणा करत सेनेवर कुरघोडी केली आहे, असे मानले जाते. त्यातच ईशा कोपीकर हीचा प्रवेश संघटनेमध्ये चैतन्य निर्माण करेल, असा विश्वास हाजी अरफात शेख यांनी यावेळी व्यक्त केला.
या सोहळ्याला संघटनेचे प्रमुख आणि राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख, राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे, भाजपचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आ.आशिष शेलार, खासदार अमर साबळे, आमदार कॅप्टन तमिळ सेलव्हन, जमाल सिद्धिकी हे उपस्थित होते.