आज केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू साधणार व्हिडीओ कॉन्फरसिंगव्दारे संवाद

0
16
  • ‘हिरकणी महाराष्ट्राची’ स्पर्धेचा शुभारंभ करणार

वाशिम, दि. ०८ : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योजकता मंत्री सुरेश प्रभू हे आज ९  फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता मुंबई येथून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक, जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक, आणि जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांचेशी संवाद साधणार आहे. जिल्ह्यातील विविध विभागामार्फत कौशल्य विकासाबाबत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती घेणार आहेत.

यावेळी श्री. प्रभू हे महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देण्यासाठी सुरु करण्यात येत असलेल्या ‘हिरकणी महाराष्ट्राची’व ‘डिस्ट्रिक्ट बिझनेस प्लॅन कॉम्पिटिशन’ या स्पर्धांचे उद्घाटन करून संबोधित करतील. यावेळी आयोजित कार्यक्रमात कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांची उपस्थिती राहणार आहे.