‘आपलं मंत्रालय’ जूनच्या अंकाचे प्रकाशन

0
21

मुंबईदि. 25 : आपलं मंत्रालय’ जून महिन्याच्या अंकाचे प्रकाशन अतिथी संपादक तथा वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव डॉ.संजय मुखर्जी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयचे संचालक (माहिती व प्रशासन) अजय अंबेकरसंचालक (वृत्त व जनसंपर्क) सुरेश वांदिले,वरिष्ठ सहाय्यक संचालक मीनल जोगळेकरमनीषा पिंगळेसहाय्यक संचालक मंगेश वरकड  उपस्थित होते.

आपल्या शरीराला निरोगी बनवणाऱ्या आणि त्याचसोबत मनासही स्वस्थ करणाऱ्या योगाचा  जीवनशैलीत स्वीकार प्रत्येक नागरिकाने करायला हवा. अशी संकल्पना जूनच्या अंकातून मांडण्यात आलेली आहे. याचसोबत मॉन्सूनच्या आगमनाचे सर्वच मुंबईकरांना प्रतीक्षा आहे. आनंद देणाराफजिती करणारा असा हा पाऊस आपल्याला ऊर्जा देणारा ठरतो. मात्रयादरम्यान आरोग्याची काळजी घेणेही तितकेच गरजेचे असते. या सगळ्याच बाबींवर लक्ष केंद्रीत करणारे लेख या अंकात वाचायला मिळतील. मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल सविस्तर माहितीचा या अंकात समावेश करण्यात आलेला आहे. पावसाळ्यातील वनभ्रमंती या विशेष लेखातून वन पर्यटनाचा निखळ आनंद वाचकांना मिळू शकणार आहे. याशिवाय कविताव्यंगचित्र यांचा या अंकात समावेश आहे.