33.8 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home महाराष्ट्र ‘त्या’ ट्विटवरून शोभा डे यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव

‘त्या’ ट्विटवरून शोभा डे यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव

0
25

मुंबई-राज्यातील सर्व मल्टिप्लेक्समध्ये प्राईम टाइममध्ये मराठी चित्रपट दाखवण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणाऱया प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांच्याविरोधात शिवसेना व राष्ट्रवादी आक्रमक झाली असून डे यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. मराठी जनतेच्या भावना दुखावणारे वक्तव्य केल्याप्रकरणी डे यांनी माफी मागावी अशी मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे.
मराठी चित्रपट प्राईम टाईमला दाखविण्याच्या निर्णयाला विरोध करत शोभा डे यांनी ट्विटरवरून फडणवीस सरकार हुकुमशहा प्रवृत्तीचे असल्याचे ट्विट केले होते.