पर्यटकांसाठी खुला झाला जगातील सर्वात भयावह फुटपाथ

0
10

मालगा- स्पेनमधील मालगा फुटपाथ हा जगातील सर्वात भयावह फुटपाथ म्हणून ओळखला जातो. अशी ख्याती असलेला फुटपाथ पुन्हा खुला करण्यात आला आहे. साहसी पर्यटन करणाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

गायटेन्स दरीवर तीन किलोमीटर लांब आणि १०० मीटर्स उंच असा हा फुटपाथ आहे. १९९९ आणि २००० मध्ये पाच मृत्यू झाल्यानंतर हा फुटपाथ बंद करण्यात आला होता. २०११मध्ये सरकारने हा फुटपाथ अधिक सुरक्षित व्हावा यासाठी प्रयत्न सुरू केले. या कामासाठी ५.५ दशलक्ष युरो खर्च झाला आहे. या फुटपाथला काचेची फरशी बसविण्यात आली आहे. नवीन पाथवेमध्ये सुरक्षा लाईन्स, स्टील बोल्ट लावण्यात आल्या आहेत. पहिल्या सहा महिन्यात प्रवेश मोफत असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. आतापर्यंत ३०,००० प्रवाशांनी बुकिंग केले आहे.