मोदींच्या हस्ते मुद्रा बँकेचे अनावरण

0
13

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (बुधवार) मुद्रा बँकेचे उदघाटन झाले. यावेळी पंतप्रधानांनी गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना जास्तीत जास्त मदत करण्याचे आश्वासन दिले. छोट्या व्यापार्‍यांना 10 लाखांपर्यंतचे कर्ज मुद्रा बँकेच्या माध्यमातून दिले जाणार आहे. ही बँक वैधानिक मंडळाप्रमाणे काम करणार आहे. सध्या ही बँक बीज भांडवलाच्या अनुदानासासारखे काम करेल. या बँकेमुळे छोटे व्यापारी, स्वयं सहायता गट, मायक्रो फायनान्स कंपन्या, न्यास यांना स्वस्तात कर्ज उपलब्ध करुन दिले जाणार आहे.
मुद्रा बँकेच्या अनावरण प्रसंगी पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘या बँकेच्या स्थापनेचे उद्दिष्ट हे ज्या छोट्या व्यापार्‍यांना व्यापर-उद्योग सुरु करण्यासाठी पैशाची अडचण येते त्यांना व्यवसाय सुरु करण्यासाठी वित्त पुरवठा करणे आहे.’ मोदी म्हणाले, की देशाला बचतीची सवय लावण्याची गरज आहे.
लघु वित्तपुरवठा संस्थांसाठी धोरण ठरवणे, त्यांची नोंदणी प्रमाणीकरण करणे तसेच मानांकन करणे ही या बँकेची प्रमुख कामे असतील. देशात सुमारे ५.७७ कोटी लघु उद्योजक आहेत. त्यांच्या नियमनाची जबाबदारी मुद्रा बँकेवर असेल. या बँकेच्या माध्यमातून त्यांचे जीवनमान उंचावणे आणि विकासाला गती देणे हे उद्दिष्ट आहे, असे अर्थ खात्याने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे