24.8 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home महाराष्ट्र चिचगडचे ठाणेदार तवाडे यांना राष्ट्रपती पोलिस शौर्यपदक

चिचगडचे ठाणेदार तवाडे यांना राष्ट्रपती पोलिस शौर्यपदक

0
31
चिचगड,दि.04- देवरी तालुक्यातील चिचगड पोलिस ठाण्याचे ठाणेदार अतुल तवाडे यांना नुकतेच राष्ट्रपती पोलिस शौर्य पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.
श्री अतुल तवाडे यांनी सन 2013 ते 17 या कालावधी मध्ये गडचिरोली जिल्ह्यात अतिसंवेदनशील भागात अतिउत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल हा सन्मान बहाल करण्यात आला. गेल्या 25 जुलै रोजी मुंबईच्या पोलिस मुख्यालयात झालेल्या सोहळ्यात महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव यांचे हस्ते श्री तवाडे यांना हे पदक देण्यात आले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहराज्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सह पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
blank