32.4 C
Gondiā
Monday, June 22, 2026
Home महाराष्ट्र माहिती व जनसंपर्क विभागाचे पांढरपट्टे नवे महासंचालक,असीम गुप्तांची बदली

माहिती व जनसंपर्क विभागाचे पांढरपट्टे नवे महासंचालक,असीम गुप्तांची बदली

0
50

मुबंई,दि.16ः-माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक म्हणून सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी डी.डी.पांढरपट्टे  यांची नियुक्ती करण्यात आली आहे.या पदावर गेली पाचवर्ष आयपीएस रँकचे अधिकारी म्हणून ब्रजेशसिंग कार्यरत होते.त्यांच्या जागेवर सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांची बदली करण्यात आली आहे.त्याचप्रमाणे  श्रीमती जे मुखर्जी व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ मुंबई यांची नियुक्ती अपर मुख्य सचिव अल्पसंख्यांक विकास विभाग मंत्रालय मुंबई,एस.ए. तागडे, प्रधान सचिव, अल्पसंख्यांक विकास विभाग यांची बदली प्रधान सचिव वस्त्रोद्योग येथे,डॉ. के.एच. गोविंदराज प्रधान सचिव वस्त्रोद्योग यांची बदली अतिरिक्त महानगर आयुक्त मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबई व बी वेणुगोपाल रेड्डी व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ यांची बदली प्रधान सचिव वने येथे करण्यात आली.

संजीव कुमार, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांची बदली आयुक्त विक्रीकर महाराष्ट्र राज्य मुंबई,राजीव जलोटा, आयुक्त विक्रीकर यांची बदली अपर मुख्य सचिव ग्रामविकास,पी वेलरासू, सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांची बदली अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका,असीम कुमार गुप्ता प्रधान सचिव ग्रामविकास यांची बदली प्रधान सचिव ऊर्जा, श्रीमती शैला ए विक्रीकर आयुक्त यांची बदली अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी, मुंबई, प्रवीण दराडे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त यांची बदली आयुक्त समाज कल्याण पुणे, श्रीमती श्वेता सिंघल जिल्हाधिकारी सातारा यांची बदली अतिरिक्त विभागीय आयुक्त पुणे,दीपक सिंगला आयुक्त मृद व जलसंधारण औरंगाबाद यांची नियुक्ती जिल्हाधिकारी गडचिरोली तर जिल्हाधिकारी गडचिरोली शेखर सिंग यांची सातारा जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली.श्रीमती मंजू लक्ष्मी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांची बदली जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग या पदावर,मिलिंद शंभरकर आयुक्त समाज कल्याण यांची नियुक्ती जिल्हाधिकारी सोलापूर म्हणून नियुक्ती करण्यात आली.