राज्यातील 103 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

0
14

मुंबई १3:- राज्य पोलिस दलातील 16 अतिरिक्त पोलिस आयुक्त आणि 87 पोलिस उपायुक्त अशा 103 पोलिस अधिकाऱ्यांच्या अशा बदल्या आणि बढत्या आज गृह विभागाने घोषित केल्या. नवी मुंबईतील अतिरिक्त पोलिस आयुक्त फत्तेसिंह पाटील, वाहतूक शाखेचे उपायुक्त प्रताप दिघावकर, पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक मनोज लोहिया यांना पदोन्नतीने मुंबईत अतिरिक्त पोलिस आयुक्त म्हणून नेमण्यात आले आहे. मुंबई पोलिस दलात उपायुक्त असलेल्या शारदा राऊत यांची पालघरच्या पोलिस अधीक्षकपदी, तर सुवेझ हक यांची रायगडच्या पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती झाली.

गेल्या महिन्यात राज्य पोलिस दलात मोठ्या प्रमाणावर खांदेपालट झाली. विशेष पोलिस महानिरीक्षकापासून अतिरिक्त महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर अतिरिक्त आयुक्त, पोलिस उपमहानिरीक्षक आणि उपायुक्तांच्या बदल्या होणे अपेक्षित होते. मात्र, या बदल्यांच्या फाईलवर निर्णय झाला नव्हता. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या फाईलवर स्वाक्षरी केली. त्यानुसार या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश आज गृह विभागाने जाहीर केले.

नवीन नियुक्तीच्या ठिकाणासह अतिरिक्त पोलिस आयुक्तांची नावे पुढीलप्रमाणे ः
– छेरींग दोरजे – अतिरिक्त आयुक्त, पश्‍चिम प्रादेशिक विभाग, मुंबई
– व्ही. एन. जाधव – अतिरिक्त आयुक्त, मुंबई
– कैसर खालिद – अतिरिक्त आयुक्त, मुंबई
– विजय चव्हाण – अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई
– किशोर जाधव – अतिरिक्त आयुक्त, एसीबी, मुंबई
– कृष्णप्रकाश – पोलिस उपमहानिरीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे
– आर. पी. सेनगावकर – पोलिस आयुक्त, सोलापूर
– शहाजी सोळुंके – पोलिस आयुक्त, अमरावती
– श्रीकांत तरवडे – अतिरिक्त आयुक्त, पुणे
– अब्दुल रहमान – उपमहानिरीक्षक, वायरलेस, पुणे
– आर. एस. खैरे – उपमहानिरीक्षक, एटीएस, पुणे
– पी. एन. रासकर – अतिरिक्त आयुक्त, पुणे
– सी. जी. दैठणकर – अतिरिक्त आयुक्त, नागपूर

मुंबई व परिसरात नेमणूक झालेल्या उपायुक्तांची नावे पुढीलप्रमाणे ः

– शारदा राऊत – पोलिस अधीक्षक, पालघर
– सुवेझ हक – पोलिस अधीक्षक, रायगड
– डॉ.एस. पी. सावंत – उपायुक्त, मुंबई
– डॉ. महेश पाटील – उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई
– प्रदीप सावंत – उपायुक्त, मुंबई
– एस. एम. वाघमारे – उपायुक्त, मुंबई
– शीला साईल – उपायुक्त, मुंबई
– एस. एस. बुरसे – उपायुक्त, मुंबई
– बी. यू. भांगे – राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई
– राहुल श्रीमाने – उपायुक्त, नवी मुंबई
– प्रवीण पवार – उपायुक्त, मुंबई
– अनिल कुंभारे – उपायुक्त, मुंबई
– एम. रामकुमार – उपायुक्त, मुंबई
– विक्रम देशमाने – उपायुक्त, मुंबई
– अंकुश शिंदे – उपायुक्त, मुंबई
– केशव पाटील – पोलिस उपायुक्त, ठाणे
– एस. आर. दिघावकर – एसआरपीएफ, नवी मुंबई
– शशिकांत महावरकर – राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई