32.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home महाराष्ट्र उत्तर प्रदेश बुलंदशहरातील साधूंच्या हत्येची घटना दुःखद व निषेधार्हच विघ्नसंतोषी मंडळींनी सामाजिक...

उत्तर प्रदेश बुलंदशहरातील साधूंच्या हत्येची घटना दुःखद व निषेधार्हच विघ्नसंतोषी मंडळींनी सामाजिक भान ठेवावे- गृहमंत्री अनिल देशमुख

0
247

blank

मुंबई दि.२9-उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे दोन साधूंची हत्या होणे ही अत्यंत दुःखदायक व निषेधार्ह
घटना आहे. तथापि अशा घटनेचे भांडवल करून त्याचा उपयोग धार्मिक ध्रुवीकरणासाठी करणाऱ्या विघ्नसंतोषी लोकांनी सामाजिक भान ठेवावे, असे स्पष्ट मत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
हे या प्रकरणी त्वरीत कारवाई करतीलच. मात्र कोणत्याही राज्यात, देशात अशा प्रकारच्या घटना होऊच नयेत. जर दुर्दैवाने असे काही घडले तर त्याचा तपास पोलिस यंत्रणेमार्फत होणारच. त्यावर विश्वास ठेवावा.
पालघर जिल्ह्यात घडलेल्या प्रकरणासारखा अशा घटनांना उगाचच धार्मिक रंग देऊन आपली राजकारणाची पोळी भाजण्याचा प्रकार कोणीही करू नये.अशा घटनांचा वापर करुन सामाजिक शांतता भंग करणा-या विघ्नसंतोषी मंडळींना ईश्वर शांत राहण्याची सद्सदविवेक बुद्धी देवो.

blank