29.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home महाराष्ट्र जून महिन्याचा ‘लोकराज्य’ प्रकाशित

जून महिन्याचा ‘लोकराज्य’ प्रकाशित

0
312

मुंबई, दि. १८- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून या प्रयत्न आणि उपाययोजनांचा आढावा घेणारा ‘लोकराज्य’ विशेषांक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने प्रसिद्ध केला आहे. ‘लोकराज्य’ चा हा जून महिन्याचा ‘विशेषांक’ डिजिटल स्वरूपात असून वाचकांना तो विनाशुल्क उपलब्ध करून देण्यात आला आहे.

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या विविध उपाययोजना, ‘मिशन बिगिन अगेन’, उद्योगांना चालना, कृषी, शिक्षण व इतर विभागांचे महत्त्वपूर्ण निर्णय, कोरोनावर मात करणाऱ्यांच्या यशकथा, नाविन्यपूर्ण उपक्रम, कोरोनाबाबत माहिती, डिजिटल प्लॅटफॉर्म, समाजमाध्यमे, महत्त्वाच्या घडामोडी, मंत्रीमंडळाचे आणि शासनाचे निर्णय आदींची माहिती ‘लोकराज्य’च्या या अंकात देण्यात आली आहे. 92 पृष्ठांचा हा विशेषांक पीडीएफ स्वरुपात विनाशुल्क उपलब्ध करून देण्यात आला आहे.

जून महिन्याचा ‘लोकराज्य’ विशेषांक वाचण्यासाठी क्लिक करा-

Failed to fetch Error: URL to the PDF file must be on exactly the same domain as the current web page. Click here for more info