छत्रपती खासदार छत्रपती संभाजीराजे यांची सामाजिक कार्यकर्ते भागवत देवसरकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

0
74
नांदेड.-नांदेड येथे कार्यक्रमानिमित्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज कोल्हापूर संस्थान छत्रपती खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले आले असता जिल्ह्यात शेतकरी चळवळीत हिरारीने काम करणारे कार्यकर्ते पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश भागवत देवसरकर यांच्या नांदेड येथिल निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.यावेळी राजेंनी सर्वांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली, तसेच 2013 पासून शिव शाहू रथयात्रा दरम्यानच्या काळात केलेल्या कार्याबद्दल व मागील सात वर्षांपासून तसेच भविष्यातील वाटचालीसाठी भागवत देवसरकर यांच्या सदैव पाठीशी असल्याचे यावेळी छत्रपती संभाजीराजे यांनी बोलताना सांगितले आहे.
 छत्रपती संभाजीराजे यांचे सोनाली देवसरकर,शिवकांताताई चव्हाण यांनी औक्षण करून स्वागत केले,शिवछत्रपती अपार्टमेंट परिवाराच्यावतीने स्वामी विवेकानंद शिक्षक सहकारी पतपेढीचे चेअरमन विनायकराव चव्हाण,दत्तात्रय पांचाळ,शुभम चव्हाण शिवम चव्हाण,पार्थ पांचाळ, पार्थ देवसरकर अनिकेत कल्याणकर यांनी स्वागत केले.यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार नरेंद्र पाटील मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष नानाराव कल्याणकर कृषी सहायक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शंकर पवार निवघेकर, सद्गुरू नरेंद्र महाराज संप्रदायाचे जिल्हा निरीक्षक विश्वनाथ इंगळे पाटील, बालाजी इंगळे पाटील यांच्यासह अनेक सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.