रितेशने केली ‘छत्रपती शिवाजी’ चित्रपटाची घोषणा!

0
17

वृत्तसंस्था

मुंबई – दिग्दर्शक रवी जाधव छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट करणार असल्याची माहिती अभिनेता रितेश देशमुखने ट्विटरद्वारे दिली आहे. रितेशची “मुंबई फिल्म कंपनी‘ या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. मात्र, त्याबाबत अधिक माहिती देण्यात आलेली नाही. रितेशचीच कंपनी असल्याने आणि त्यानेच घोषणा केल्याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका रितेशच साकारेल, अशी शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. “लय भारी‘ या माध्यमातून रितेश मराठी चित्रपट क्षेत्रात प्रवेश केला आहे. पहिल्याच चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. रितेशचा हा मराठीतील दुसरा चित्रपट असेल. रितेशची पत्नी अभिनेत्री जेनेलिया डिसूझा-देशमुख हीनेही रितेशच्या ट्‌विटला प्रतिसाद दिला आहे. यापूर्वी 1977 साली भालजी पेंढारकर यांनी “प्रभाकर पिक्‍चर्स‘च्या माध्यमातून ‘छत्रपती शिवाजी‘ हा चित्रपट केला होता.