जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने काढलेल्या सामाजिक न्याय विभागाच्या माहिती पुस्तिकेचे व सामाजिक न्याय विभागाच्या ‘व्हिजन डाक्युमेंट’चे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते प्रकाशन

0
8

लातूर,दि.1,):- अनुसूचित जाती उपयोजनेतंर्गत जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने सामाजिक न्याय विभागाच्या माहिती पुस्तिकेचे व सामाजिक न्याय विभागाच्या ‘व्हिजन डाक्युमेंट’ चे प्रकाशन  राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य  मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री  अमित देशमुख यांच्या हस्ते जिल्हा क्रिडा संकूल लातूर येथे संपन्न झाले.

यावेळी महानगरपालिकेचे महापौर विक्रांत गोजमगुंडे, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, मनपा आयुक्त अमन मित्तल, जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण शिवकांत चिकुर्ते, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, जेष्ठ नागरिक आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या माहिती पुस्तिकेत अनुसूचित जाती उपयोजना, विभागीय स्तरावर 1 हजार विद्यार्थी क्षमतेची मागासवर्गीय मुलां-मुलींकरीता शासकीय वसतिगृह, मुलां-मुलींसाठी जिल्हा व तालुका स्तरावरील शासकीय वसतिगृह, अनुसूचित जाती व नवबौध्द मुलां -मुलींकरीता तालुका स्तराव 100 शासकीय निवासी शाळा सुरु करणे, विभागीय उच्चस्तर औद्योगिक प्रशिक्षण संस्था, समाज कल्याण संस्थांना अनुदाने ( समाजकार्य महाविद्यालय), भारत सरकार शिष्यवृत्ती व शिक्षण फी, परिक्षा फी प्रतिपुर्ती योजना, राज्यातील 100  अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना देशातील शैक्षणिक संस्थामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना, अनुसूचित जातीच्या मुलां-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमांशी संलग्न वसतिगहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता व विद्यावेतन, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार, मॅट्रीकपुर्व शिक्षण फी, परिक्षा फी प्रदाने, सैनिक शाळेतील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, माध्यमिक शाळेत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, इयत्ता नववी व दहावीमध्ये शिकत असणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकारची मॅट्रीकपूर्वी शिष्यवृत्ती योजना, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन, अनुसूचित जाती व नवबौध्द यांच्यासाठी मोटार वाहन चालक प्रशिक्षण, रमाई आवास ( घरकुल) योजना, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करणे, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या, अत्याचारास बळी ठरणाऱ्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या कुटूंबांतील सदस्यांना अर्थ सहाय्य, राज्याचे जेष्ठ नागरिक धोरण, मातोश्री वृध्दाश्रम योजना, तृतीयपंथी यांच्या कल्याणासाठी त्यांच्या हक्काचे संरक्षण करण्याची योजना, ऊसतोड कामगारांना ओळखपत्र देणे तसेच स्थानिक पातळीवर निर्माण होणाऱ्या समस्येचे निराकरण करण्याची योजना, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, वास्तव … ॲट्रोसिटी कायद्याचे याबाबतची सविस्तर माहिती या पुस्तिकेत देण्यात आलेली आहे, असे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी सांगितले.

तर ‘व्हिजन डाक्युमेंट’ मध्ये समाज कल्याण विभागाच्या पुढच्या वाटचालीचा सविस्तर आराखडा असल्याचे समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवकांत चिकुर्ते यांनी सांगितले.

***