निसर्गातील प्रत्येक जीव महत्वाचा आहे – वनरक्षक एम. एफ. शेख यांचे प्रतिपादन

0
14

कन्या शाळेत वन्य जीव सप्ताह कार्यक्रम साजरा

धर्माबाद :- (साहेबराव दुगाने)-निसर्गातील अन्नसाखळी मध्ये प्रत्येक घटक एकमेकांवर अवलंबून आहेत म्हणून प्रत्येक जीव महत्वाचे आहे असे प्रतिपादन धर्माबादचे वनरक्षक अधिकारी एम. एफ. शेख यांनी कन्या शाळेत आयोजित वन्य जीव सप्ताह निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
धर्माबाद येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेत वन्य जीव सप्ताह निमित्ताने वन्य जीव ओळख व परिचय कार्यक्रम वाईल्ड लाईफ क्लब तर्फे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धर्माबादचे वनरक्षक एम. एफ. शेख हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून वनरक्षक श्रीमती अंजना खनपट्टे, वनसवेक हरी पुयड, सर्पमित्र क्रांती बुद्धेवार यांची उपस्थिती होती. यावेळी सर्पमित्र क्रांती बुद्धेवार यांनी निसर्गातील वन्य जीवाचे महत्व स्पष्ट करून सांगितले. इयत्ता तिसरी ते सातवी वर्गातील विद्यार्थ्यांची यावेळी जंगली प्राणी व पक्षी ओळखण्याबाबत एक परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर वनरक्षक एम. एफ. शेख यांनी निसर्गातील जीवनचक्र साखळी याच्याविषयी विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले. शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक नासा येवतीकर, विषय शिक्षिका सौ. एम. डी. जोशी, श्रीमती सुमित्रा खेडकर, एजाज सय्यद आणि माधव हिंमगिरे या शिक्षकांसह गौरकर या वन्यप्रेमी नागरिकासह असंख्य विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. सदरील कार्यक्रम नांदेड जिल्हा वन विभाग अधिकारी श्री वाबडे, वन परिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक भोकरचे उपवनसंरक्षक श्री मूळवन, वनपरिमंडळ अधिकारी उमरीचे श्री पेरलेवार यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील कार्यक्रम संपन्न झाले.