डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास उलगडणारे दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन आवर्जुन पहावे

0
13
– केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आवाहन
केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूरचा उपक्रम
नागपूर दि. 4 – केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय नागपूरच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास उलगडणारे दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन आवर्जुन पहावे, यासाठी अनुयायांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन या प्रदर्शनाला भेट देऊन बाबासाहेबांच्या विचारांची प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी आज येथे केले.
66 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्त केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर आणि ओगावा सोसायटी, ड्रॅगन पॅलेस, कामठी यांच्या संयुक्त विद्यमाने 4 ते 6 ऑक्टोबर 2022 रोजी ड्रॅगन पॅलेस कामठी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृातिक व संशोधन केंद्र येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनावर आधारीत ‘’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर- महामानवाचा जिवन प्रवास’’ हे मल्टिमिडीया छायाचित्र प्रदर्शन लावण्यात आले असून या प्रदर्शनाचे उदघाटन आज केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा आणि माजी राज्यमंत्री ऍड. सुलेखाताई कुंभारे, वाहतूक शाखेचे नागपूर पोलिस उपायुक्त डॉ.सारंग आव्हाड, केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूरचे प्रभारी सहायक संचालक तथा क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, भुपेश थुलकर प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण तसेच पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी प्रदर्शनीची पाहणी देखील केली. दीक्षाभूमी नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एक सुंदर स्मारक ऍड. सुरेखाताई कुंभारे यांनी कामठी येथे स्थापन केले असून याला भेट देण्यासाठी लाखोंच्या संख्येने अनुयायी येतात. मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मील येथील स्मारक देखील एक ते दोन वर्षात पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .केंद्रीय संचार ब्युरो नागपुर तर्फे आयोजित प्रदर्शन आजपासून 6 ऑक्टोबरपर्यंत सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत पाहण्यासाठी निःशुल्क सुरू राहणार आहे. या मल्टिमिडीया छायाचित्र प्रदर्शनात डॉ. बाबासाहेब आंबेडकराचे शैक्षणिक कार्य, संविधान निर्मितीमधील योगदान, धम्मदीक्षेचा सोहळा आणि त्यांचे कौटुंबिक, राजकीय प्रसंग प्रेक्षकांना पहावयास मिळणार आहे. तसेच १७ मिनिटांचे माहिती पट दाखवण्यात येत आहे. प्रदर्शनाच्या ठिकाणी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागातर्फे ग्रंथविक्रीही सवलतीच्या दरात सुरू आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी सहायक संचालक हंसराज राऊत यांनी केले. संचालन व आभार प्रदर्शन उमेश महातो यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी तांत्रिक सहायक संजय तिवारी, संजीवनी निमखेडकर, नरेश गच्छकायला, संतोष यादव, चंदू चड्डुके यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी घेत आहेत.