बोळेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला आर्थिक मदत व शालेय शालेय शैक्षणिक साहित्य वाटप

0
11

नांदेड-सांगली जिल्ह्यातील बाबरवस्ती शाळेचे मुख्याध्यापक व सांगली जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त दिलीप वाघमारे यांचे वडील कै. मारोती चांदू वाघमारे यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त.(नांदेड)बिलोली तालुक्यातील बोळेगाव येथील स्मृतिशेष मारोती चांदू वाघमारे यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्ताने सरपंच विश्वनाथ बोधनापोड म्हणाले कुटुंबाला दारिद्र्य आणि अज्ञानी स्थितीतून बाहेर काढण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. मोलमजूरी करुन आपल्या मुलांना चांगले शिक्षण दिले. कितीही प्रतिकूल परिस्थिती ला अनुकूल करता येऊ शकते, याचे मुर्तीमंत उदाहरण स्थापित केले. त्यांच्या स्मृती लोककल्याणकारी उपक्रम साजरे करुन जपण्याचा प्रयत्न कुटूंबियांनी केलेला आहे.त्यांच्या स्मृती जागवण्यासाठी बोळेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस शालेय लेखन साहित्य वाटप तसेच ५०५१/-आर्थिक मदत परिवाराने केली असंही त्यांनी सांगितलं. तर पत्रकार प्रल्हाद वाघमारे म्हणाले फक्त वही पेन आणि माहिती म्हणजे शिक्षण नाही. तर बुध्दीला सत्याकडे ,भावनेला माणूसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण जसे जेवल्यावर होणारे समाधान तात्पुरते असते. याउलट शिक्षणामुळे मिळणारी ज्ञानाची शिदोरी आयुष्यभर पुरते.पोटाची भुक भागवावीच पण एक पाऊल पुढे टाकून माणसाने शिक्षण घेऊन बुध्दीची भुकही भागवावी. जसा माणूस उपासमारीने अशक्त होवून अल्पायुषी होतो, तसा तो शिक्षणाअभावी जीवंतपणी दुसऱ्याचा गुलाम होतो म्हणून शाळेत केवळ चौदाखडी शिकवू नये तर मुलाची मने सुसस्कृंत व गुणवत्तामय बनवावी.

समाज हितार्थ या ज्ञानप्राप्त मुलांनी आपली सामाजिक बांधीलकीची कर्तव्ये योग्य व समर्थपणे पार पाडावीत असे शिक्षण असावे डॉ.बाबासाहेबानी केलेला ‘शिका’ हा उपदेश माझे काका स्मृतिशेष मारोती चांदू वाघमारे यांनी कधी ऐकला माहित नाही पण तो उपदेश आपल्या जीवनात प्रत्यक्ष उपयोगात आणला आणि तसेच ते जगले.आपल्या मुलांना तेच संस्कार केले, आम्हांस घडविले असं मत त्यांनी व्यक्त केले.मोलमजुरी करत असताना सुद्धा काळाची पाऊले ओळखत शिक्षणासाठी पतीच्या स्मृतीप्रित्यर्थ पाच हजार एकावन्न रुपयांची मदत करणारी माऊलीखरोखर धन्य आहे असे सहशिक्षक वड्डमवार यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्धापूरे बिल.एस.यांनी केले तर सुत्रसंचालन सौ.तेली बि.एल. मॅडम तर आभार एन.बि.वड्डमवार यांनी केले.याप्रसंगी उपासिका मोहनाबाई मारोती वाघमारे, विश्वनाथ बोधनापोड सरपंच ग्राम पंचायत बोळेगाव, रमेश विचारे, अनिता वाघमारे, प्रतिमा वाघमारे,राजू बोधनापोड, मुख्याध्यापक अर्धापूरे बि.एस,एन.बि. वड्डमवार,सौ.तेली बि.एल. पत्रकार प्रल्हाद वाघमारे व शिक्षक, विद्यार्थी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.