श्रामणेर दिक्षा समारंभ व धम्म प्रशिक्षणात आदिवासी कुटुंबांने घेतली बौद्ध धम्म दिक्षा

0
7

हिंगोली,दि.12ः- जिल्ह्यातील केलसुला साखरा ता सेनगाव येथे रामेश्वर खेलबाडे व शोभाताई खेलबाडे यांनी सहपरिवार बौद्ध धम्म दिक्षा भदंत ज्ञानजोती महाथेरो ताडोबा जंगल चंद्रपुर यांच्या हस्ते तारीख दहा फेब्रुवारी रोजी हजारोच्या उपस्थितीत बौद्ध धम्म दिक्षा दिली. रामेश्वर खेलबाडे व शोभाताई यांच्या जुळ्या मुला मुलींचा धम्मक्रांती मुलीचे नाव तर धम्मविर मुलाचे नामकरण देखील भदंत ज्ञानजोती महाथेरो यांनी केले व सह परिवार बौद्ध धम्म दिक्षा दिली.
तारीख सहा फेब्रुवारी रोजी भदंत धम्मदिप महाथेरो कलगाव हिंगोली यांनी सोळा मुलांना श्रामणेर दिक्षा दिली व पाचही दिवस बौद्ध धम्माची आचार संहिता व ध्यान साधना सह धम्म देसना दिली. पाच दिवसांत विविध विषयांवर मार्गदर्शन व प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या मध्ये वामनराव हराळ, एड.साहेबराव सिरसाठ, एड.रावन धाबे, एड.अभिजीत खंदारे, एड.सुनील बगाटे, राजरत्न बगाटे, कृष्णाराव पाटील, सुदाम खंदारे, नाथराव चवरे, सरपंच अशोक इंगळे, नानासाहेब पाटील,केशव भोरगे, एस.पी.मोरे, हरिभाऊ मेश्राम, प्रा. माधव सरकुंडे,प्रा. वनिता सरकुंडे, देवराव जाधव, रोहिदास वाटोळे, कुंडलिक क-हाळे, यादव क-हाळे, राहुल घोंगडे, प्रभाजी घोंगडे, सिद्धार्थ कांबळे राजुरा अमरावती, मनोहर भगत, कानडी मुर्तीजापुर, सुधाकर मंडवधरे नांदगाव खांडेश्वर, संतोष पाटील विराईत अमरावती यांच्या सह अनेक मान्यवर मंडळीनी बौद्ध धम्म प्रशिक्षण कार्यशाळा व श्रामणेर प्रशिक्षण कार्यशाळा मध्ये मार्गदर्शन केले तर दररोज रात्री मनोरंनातून प्रबोधन व प्रबोधनातुन परिवर्तन करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम शाहिर नामदेव दिपके व संच संतुकपिंपरी , प्रा. महेश देवळे व जयश्री भडांगे,व संच वाशिम, आधुनिक गाडगे बाबा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळख निर्माण झालेले सामाजिक कार्यकर्ते पी एस खंदारे वाशिम, गौतम खंदारे व संच वरखेडा आणि शाहिर माधव वाढवे आणि संच हदगाव नांदेड यांनी समाजातील अंधश्रद्धा,अनिष्ट रुढी व परंपरा दुर करून समाजाने वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी संत समाज सुधारकांचा विवेकी वारसा समाजात रूजवून कार्य करण्यासाठी मार्गदर्शन केले, धम्म दिक्षा व धम्म प्रशिक्षण कार्यशाळा साठी दलित मित्र बबनराव मोरे यांनी सतत दोन महिने अथक परिश्रम घेतले, भिक्खु संघास सरपंच अमोल मस्के हिवरखेडा व सामाजिक कार्यकर्ते सुरेश इंगळे साखरा यांनी भोजनदान दिले, पाचव्या दिवशी केलसुला गावातून भिक्खु संघाची समता रॅली ने ग्रामस्थ मोहित झाले, प्रास्ताविक व धम्म दिक्षा घेण्यामागची भुमिका रामेश्वर खेलबाडे व शोभाताई खेलबाडे यांनी मांडली. पाचही दिवसाचे सुत्रसंचालन पी. एस. खंदारे यांनी केले तर आभार दलित मित्र बबनराव मोरे यांनी मानले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी शेत मालक बंडू इंडाळकर, कान्होबा इंगळे, गोरखनाथ कोकाटे, कमलाकर लाटे, अरूण इंगळे,शिवाजी रंजवे, कालिदास लाटे, संतोष अंभोरे, देवराव जाधव यांचे सह केलसुला साखरा हिवरखेडा व पंचक्रोशीतील महिला, पुरूष मंडळी सह बालकांनी अथक परिश्रम घेतले.