युवक बिरादरीच्या वतीने ‘एलोरा मीट’

0
6

छत्रपती संभाजीनगर-युवक बिरादरी (भारत) च्या वतीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पेस सेंटर (नांदराबाद, ता. खुलताबाद) येथे ‘एलोरा मीट’ हे युवा नेतृत्व शिबीर पार पडले. 1 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान झालेल्या या युवा नेतृत्व प्रशिक्षण शिबिरात महाराष्ट्राच्या विविध भागातून युवक युवती सहभागी झाले होते. लेखक – दिग्दर्शक सत्यजीत खारकर यांच्या हस्ते या ‘एलोरा मीट’चे उद्घाटन झाले. या कार्यक्रमादरम्यान युवक बिरादरीचे संस्थापक पद्मश्री क्रांती शाह, खासदार इम्तियाज जलील, छत्रपती संभाजीनगर विभागाच्या रेल्वे पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील (IPS), माजी कुलगुरू आणि प्रसिद्ध वक्ते डॉ. सुधीर गव्हाणे यांनी मीट द पर्सनॅलिटी या विशेष सत्रात शिबिरार्थींशी संवाद साधला, त्यांच्या क्षेत्रात होत असलेलं काम, त्याबद्दल युवकांच्या मनात असलेली उत्सुकता यावर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.

या शिबिरात महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनचे संपादक अभिजीत कांबळे, युवक बिरादरीचे कार्य. महासंचालक पंकज इंगोले, वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया, युवक बिरादरीच्या विश्वस्त स्वर क्रांती, युवक बिरादरीचे व्हाइस चेयरपर्सन आशुतोष शिर्के, माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ आणि उद्योजक सुजीत कुलकर्णी, इतिहास अभ्यासक आणि वक्ते राज कुलकर्णी, सर्फराज अहमद, पत्रकार पूनम इंगोले, ज्येष्ठ बिरादर नागेंद्र राय, युवक बिरादरीचे प्रकल्प संचालक निहार देवरुखकर, प्रशांत वाघाये, सचिन वाकुळकर, डॉ. अंजली गायधने, ज्येष्ठ बिरादर आणि नृत्यांगणा मेधा दिवेकर आदी मान्यवरांनी सामाजिक जबाबदारी, नेतृत्व, व्यक्तीमत्व, उद्योजकता, पर्यावरण, भारताचा गौरवशाली इतिहास, व्यवस्थापन, कौशल्य विकास, करिअर निवडताना, थिएटर, दक्खन संस्कृती, ब्लॉक चेन तंत्रज्ञान, स्वच्छता अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, त्यांच्याशी संवाद साधला.

‘एक सुर, एक ताल, अभिरुप युवा संसद, युवाभूषण या कार्यक्रमांची देखील माहिती या शिबिरात देण्यात आली. दौलताबाद किल्ला, वेरूळच्या लेण्या या ठिकाणी शिबिरार्थींनी भेट दिली, इतिहास जाणून घेतला. विविध स्पर्धा या दरम्यान घेण्यात आल्या. ज्येष्ठ बिरादर किरण बिर्ला यांच्या हस्ते पारितोषिक वितरण पार पडले. या शिबिरासाठी श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, हिस्लॉप कॉलेज नागपूर, दयानंद कला महाविद्यालय लातूर, एस. के. एच. मेडिकल कॉलेज बीड, प्रथम अरोरा सेंटर फॉर एज्युकेशन यांचे विशेष सहकार्य लाभले.

शिबिराचं व्यवस्थापन सचिन वाकुळकर, देवेंद्र सिंग, प्रशांत वाघाये, जयेश जाधव, ऋषीकेश गोखले, गायत्री जलेला, अक्षय जाधव, साक्षी बोरकर, निकेश लिखार यांनी केलं.