पीक विम्याचा अग्रीम दिवाळी पूर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल – कृषीमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे

0
2
बीड, दि. १६  : जिल्ह्यात पीक विम्याची अग्रीम रकम शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी जमा होईल असा शब्द मी आज देतो, अशा शब्दात कृषीमंत्री आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना वचन आज यांत्रिक लाभ योजनेतील लाभ वितरण प्रसंगी दिले. जिल्हा विकासाच्या वाटेवर न्यायचा आहे हेच उद्दीष्ट ठेवून आपण काम करीत आहोत असेही ते यावेळी म्हणाले.
येथील सामाजिक न्याय भवन परिसरात कृषी विभागातर्फे देण्यात आलेला ट्रॅक्टरचे वाटप त्यांचा हस्ते झाले. यावेळी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बी. के जेजूरकर प्रमुख उपस्थिती होती.
आज श्री मुंडे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना ट्रॅक्टरची चावी आणि प्रमाणपत्र देण्यात आले. ट्रॅक्टर प्रदान लाभार्थ्यांना उद्देशून अशी मुंडे म्हणाले, मिळालेले ट्रॅक्टर केवळ आपल्यापुरते मर्यादित न वापरता आपले काम झाल्यावर  इतर शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल अशा माफक शुल्कावर उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन श्री मुंडे यांनी यावेळी केले.
कृषीमंत्री  यांच्या प्रयत्नाने बीड जिल्ह्यासाठी कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत २०२३ – २४ मध्ये, कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान योजनेमध्ये  २४५ शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला. यासाठी एक कोटी 47 लाख 25 हजार रुपये खर्च झाले.  राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत 162 शेतकरी लाभांवीत झाले असून यासाठी ६५.४० लाख रूपयांच्या निधी निधी खर्च करण्यात आला.
राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये अनुदान वितरणासाठी तीन कोटी 17 लाख 79 हजार 89 हजार रुपये वितरीत करण्यात आला. याचा लाभ  ५२६ शेतकऱ्यांनी घेतला. असे एकूण पाच कोटी तीस लाख 44 हजार रुपयांचा निधी बीड जिल्ह्यास मंजूर करण्यात आलेला आहे. यामुळे जिल्ह्यातील निवड सूची यादीतील ९३३ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.
यांत्रिकीकरणामुळे शेतीची कामे वेळेवर व मजुराच्या तुलनेत कमी खर्चात होतील. जसे की पिक पेरणीपूर्व मशागत, काडणी व मळणी, फवारणी, आंतरमशागत करणे. नियोजनाच्या दृष्टीने जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे संपर्क करून यांत्रिकीकरण योजनाचा लाभ घ्यावा. असे आवाहन यावेळी करण्यात आले.