प्रणव कोरडीची ऑल इंडिया युनिव्हर्सिटी/ विद्यापीठ स्पर्धेसाठी साउथ झोन मधून निवड

0
9

छत्रपती संभाजीनगर- असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजच्या संयुक्त विद्यमाने कृष्णा विद्यापीठ, मछलीपट्टनम,विजयवाडा,आंध्र प्रदेश यथे आयोजित दक्षिण विभागीय आंतरविद्यापीठ टेनिस स्पर्धा मध्ये स्पर्धेत आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलगणा , तामिनाडू , केरळ ,मधील अशा साउथ झोन मधील 54 विद्यापीठ, स्पर्धकांनी सहभाग घेतला. (औरंगाबादच्या) छत्रपती संभाजीनगरचा प्रणव कोरडे याने केएल विद्यापीठ,विजयवाडा,आंध्र प्रदेश तर्फे खेळून आपली चमकदार कामगिरी करून विजय नोंदवला.तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी विजय नोंदवला, त्यामुळे त्याचे विद्यापीठ ऑल इंडिया लेवलवर लॉन टेनिसचे सामने खेळण्यासाठी निवड झाली आहे.त्यांचा सामना दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी जयपुर येथे होणार आहे. स्पर्धेमध्ये केएल विद्यापीठ,विजयवाडा,आंध्र प्रदेश यांनी खालील विद्यापीठ संघावर विजय नोंदवला आहे.
राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ एचएस, बेंगळुरू यांना सामन्यात 3-0 ने पराभूत केले.मदुराई कामराज विद्यापीठ, तामिळनाडू यांना स्पर्धेच्या सामन्यात 3-0 ने पराभूत केले.जेएनटीयू आंध्र प्रदेश यांना स्पर्धेच्या सामन्यात 3-0 ने पराभूत केेले तर जैन विद्यापीठ बेंगळुरू यांना स्पर्धेच्या सामन्यात 3-0 ने पराभूत केले.क्वार्टर फायनल मध्ये अण्णा विद्यापीठ चेन्नई यांना स्पर्धेच्या सामन्यात 3-2 ने पराभूत केले.
उपांत्य फेरीत प्रवेश केला तसेच त्या प्रवेशद्वारे जे प्रथम आलेले चार विद्यापीठे ऑल इंडिया युनिव्हर्सिटी स्पर्धेसाठी  निवड झालेली आहेत. तसेच ही सर्व विद्यापीठे खेलो इंडिया साठी ही पात्र ठरली आहेत.त्यामुळे प्रणव कोरडेला ऑल इंडिया पुरुष स्पर्धेमध्ये आपली चमक दाखवण्यासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. अशी कामगिरी करणारा छत्रपती संभाजी नगर मधील हा पहिला खेळाडू आहे. ज्याची ऑल विद्यापीठ लॉन टेनिस या खेळासाठी निवड झाली आहे. तसेच या विद्यापीठाचे संघ 2024 मध्ये होणाऱ्या खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेसाठीही पात्र ठरले आहेत. स्पर्धेमधून साउथ झोन विभागातून विभागातून ही चार विद्यापीठे ऑल इंडिया विद्यापीठ लेवल वर लॉन टेनिसचे सामने खेळण्यासाठी निवड झाली आहे.त्यामध्ये SRM विद्यापीठ,आंध्र विद्यापीठ, भारतीय विद्यापीठ व .KLEF (कोनेरू लक्ष्मय्या एज्युकेशन फाउंडेशनचे म्हणजे विजयवाडा,आंध्र प्रदेशातील केएल)विद्यापीठ आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना कृष्णा विद्यापीठ,मछलीपट्टनम, विजयवाडा,आंध्र प्रदेश यथे पारितोषिक वितरण करण्यात आले आहे.प्रणव कोरडे एमएसएलटीएचा खेळाडू आहे. त्याला कोच गजेंद्र भोसले यांचे मार्गदर्शन लाभत आहे. या यशाबद्दल जैन मॅडम इंडोरन्स कंपनीच्या व उच्च न्यायालयातील सीनियर कौन्सिल विजय कुमार सपकाळ तसेच शेतकरी संघटनेचे ॲड.अजित काळे आदींनी त्याचे अभिनंदन केले आहे व त्याच्या पुढील कारकीर्दीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.